Farmers Protest : शेतकऱ्यांचे अंशत: 'रेल्वे रोको' आंदोलन संपले; मात्र निर्धार कायम

Delhi Farmers protest : हमीभाव कायद्यासह विविध प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपला निर्धार पक्का ठेवला आहे. रविवारी (ता. १०) देशभर रेल्वे आंदोलन केल्यानंतर शेतकरी नेत्यांनी, 'मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन असेच सुरू राहणार', असल्याचे म्हटले आहे.
Farmers Protest
Farmers ProtestAgrowon

Pune News : हमीभाव कायद्यासह विविध प्रमुख मागण्यांसाठी गेल्या २७ दिवसापासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आज रविवारी (ता. १०) आपला मोर्चा रेल्वे रूळांकडे वळवला. आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी फिरोजपूर, अमृतसर, रूपनगर आणि गुरुदासपूर जिल्ह्यांसह पंजाबमधील अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर दुपारी १२ ते ४ या वेळेत 'रेल्वे रोको' आंदोलन केले. तसेच सरकार विरोधात घोषणाबाजी करताना मागण्या मान्य करण्याची मागणी केली.

यावेळी दुपारी १२ वाजल्यापासून चंदीगड, देविदासपुरासह पंजाबमधील अनेक भागात शेतकरी रेल्वे रूळाकडे निघाले होते. यावेळी 'रेल रोको' आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमृतसरच्या देविदासपुरा भागात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्यासोबत खाटा, चटई व इतर साहित्यही आणले होते. 'जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे', शेतकरी नेत्यांनी म्हटले आहे.

Farmers Protest
Farmers protest : शेतकऱ्यांचं आज देशव्यापी 'रेल्वे रोको' आंदोलन

हमीभाव कायद्यासह विविध प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन केले जात आहे. तर पंजाब आणि हरियानाच्या शेतकऱ्यांना हमीभावात सर्व पिकांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी केंद्र सरकारकडे लावून धरली आहे. याच पार्श्वभूमीवर आज देशभर रेल्वे रोको आंदोलन करण्यात आला होता. जो अंशत: 'रेल्वे रोको' आंदोलन होते. ४ वाजताच चंदीगड, देविदासपुरासह पंजाबमधील अनेक भागात रेल्वे रूळांवर बसलेले शेतकरी बाजूला झाले. दरम्यान देवीदासपुरा येथील अमृतसर-दिल्ली रेल्वे मार्गावर 'रेल्वे रोको' आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

श्रवणसिंह पंढेर म्हणाले

यावरून श्रवणसिंह पंढेर म्हणाले की, "आम्ही देवीदासपुरा येथील अमृतसर-दिल्ली रेल्वे मार्गासह पंजाबच्या सर्व २२ जिल्ह्यांमधील प्रमुख रेल्वे मार्ग ४ तासांसाठी रोखत आहोत. दुपारी १२ वाजता चंदीगड आणि देविदासपुरा येथे शेतकऱ्यांनी रेल्वे रुळांवर बसून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. अमृतसरमध्ये शेतकरी रेल्वे ट्रॅकवर पोहोचले होते. शेतकरीही खाटा, गालिचे व इतर साहित्य घेऊन रेल्वे रुळावर आले होते".

"आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे. जेव्हा आम्ही हे आंदोलन सुरू केले तेव्हा आम्हाला माहित होते की हा विरोध आम्ही ४० दिवसांत संपवू शकणार नाही. यामुळे आम्ही आमची ताकद वाढवत आहोत, असेही पंढेर यांनी निवडणुकीच्या आचारसंहितेबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर माध्यमांना दिले आहे.

Farmers Protest
Farmers protest : दिल्ली शेतकरी आंदोलन-२ला हरियाणाच्या खाप पंचायतींचा पाठिंबा; ११ सदस्यीय समितीची स्थापन

याआधी पंढेर यांनी शनिवारी (ता.०९) देशातील शेतकऱ्यांना माध्यमांच्या माध्यमातून आवाहन केले होते. पंढेर म्हणाले होते की, "१३ फेब्रुवारीपासून पंजाब-हरियाणा सीमेवर सुरू झालेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून आम्ही रविवारी (ता.१०) देशभरात 'रेल्वे रोको' आंदोलन करणार आहोत".

"या आमच्या 'रेल्वे रोको' आंदोलनाला मोठ्या संख्येने सर्व शेतकरी, मजूर आणि सर्वसामान्य जनतेनं पाठिंबा द्यावा. आज दुपारी १२ ते ४ यावेळेत 'रेल्वे रोको' आंदोलन करायचा आहे. हा अंशतः 'रेल्वे रोको' असून यामुळे रेल्वे प्रवाशांसह लोकांची गैरसोय होऊ शकते" असेही पंढेर यांनी म्हटले आहे.

'या' भागात गाड्या थांबवल्या

देशात करण्यात आलेले 'रेल्वे रोको' आंदोलनास फिरोजपूर, अमृतसर, रूपनगर आणि गुरुदासपूर जिल्ह्यांसह पंजाबमधील अनेक ठिकाणी चांगला पाठिंबा मिळाला. येथे अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर शेतकरी बसले होते. भारतीय किसान युनियन, भारती किसान युनियन (डाकौंडा-धानेर) आणि क्रांतिकारी किसान युनियनही 'रेल रोको' आंदोलनात सहभाग घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com