Farmers protest : शेतकऱ्यांचं आज देशव्यापी 'रेल्वे रोको' आंदोलन

Delhi Farmers protest : पंजाब आणि हरियानाच्या शेतकऱ्यांनी हमीभाव कायद्यासह विविध प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. रविवारी (ता. १०) देशातील शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार असून चार तास देशव्यापी 'रेल्वे रोको' आंदोलन करणार आहेत.
Farmer protest Delhi
Farmer protest DelhiAgrowon

Pune News : हमीभाव कायद्यासह विविध प्रमुख मागण्यांसाठी पंजाब आणि हरियानाचे हजारो शेतकरी शंभू आणि खनौरी सीमेवर आंदोलन करत आहे. या आंदोलनाचा रविवार (ता. १०) २७ वा दिवस असून आज देशातील शेतकरी यात सहभागी होणार आहेत. आंदोलक शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी १३ फेब्रुवारीपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. तर शेतकरी नेत्यांनी केलेल्या आवाहनानुसार आज देशव्यापी 'रेल्वे रोको' आंदोलन केले जाणार आहे. हे आंदोलन आज दुपारी १२ ते ४ या वेळेत केले जाणार असून हरियाणा आणि पंजाबमध्ये सुमारे ६० ठिकाणी हजारो शेतकरी रेल्वे रोकतील. यामुळे काही काळ रेल्वे सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रवाशांना देखील त्रास होऊ शकतो.

संयुक्त मजूर मोर्चाचे नेते श्रवण पंढेर यांनी देशातील शेतकऱ्यांना माध्यमांच्या माध्यमातून आवाहन केले आहे. पंढेर म्हणाले, "१३ फेब्रुवारीपासून पंजाब-हरियाणा सीमेवर सुरू झालेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून आम्ही रविवारी (ता.१०) देशभरात 'रेल्वे रोको' आंदोलन करणार आहोत".

"आम्ही सर्व शेतकरी, मजूर आणि सर्वसामान्य जनतेला आवाहन करतो की, या आमच्या 'रेल्वे रोको' आंदोलनाला मोठ्या संख्येने पाठिंबा द्यावा. आज दुपारी १२ ते ४ यावेळेत 'रेल्वे रोको' आंदोलन करायचा आहे. हा अंशतः 'रेल्वे रोको' असून यामुळे रेल्वे प्रवाशांसह लोकांची गैरसोय होऊ शकते" असेही पंढेर यांनी म्हटले आहे.

Farmer protest Delhi
Farmers protest : दिल्ली शेतकरी आंदोलन-२ला हरियाणाच्या खाप पंचायतींचा पाठिंबा; ११ सदस्यीय समितीची स्थापन

तसेच पंढेर म्हणाले, "आंदोलक शेतकरी फिरोजपूर, अमृतसर, रूपनगर, गुरुदासपूर जिल्ह्यांसह पंजाबमधील अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर बसणार आहे. आज दुपारी हे आंदोलन केलं जाणार आहे".

Farmer protest Delhi
Farmer Protest : शेतकरी आंदोलन आजपासून पुन्हा सुरू; देशाच्या विविध भागातून शेतकरी दिल्लीकडे रवाना!

केंद्राने पळ काढू नये

१३ फेब्रुवारीपासून एमएसपी कायद्यासह स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी, शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन, शेती कर्ज माफीसह लखीपूरा खेरी हिंसाचार प्रकरणातील पीडितांना न्याय यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी दिल्लीच्या सीमेवर 'दिल्ली चलो आंदोलन' करत आहेत. तर गेल्या २६ दिवसापासून ते पंजाब आणि हरियाणामधील शंभू आणि खनौरी सीमेवर तळ ठोकून आंदोलन करत आहेत. यादरम्यान शनिवारी (ता.०९) शेतकरी नेते जगजितसिंग डल्लेवाल यांनी, "केंद्राने सर्व पिकांवर एमएसपीसाठी कायदेशीर हमी देण्याच्या जबाबदारी घ्यावी. यातून पळ काढू नये", असं आवाहन केलं आहे.

कोण कोणत्या संघटाना होणार सहभागी

दिल्ली चलो आंदोलनात सध्या २५० हून अधिक शेतकरी संघटना सहभागी आहेत. तर आज रविवारी करण्यात येणाऱ्या 'रेल्वे रोको' आंदोलनात भारती किसान युनियन (एकता उग्रहण), भारती किसान युनियन आणि क्रांतीकारी किसान युनियन, संयुक्त किसान मोर्चा अशा शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com