Sugarcane Field Fires : ब्राझीलच्या ऊस पट्ट्यात आगीचे तांडव

Brazil Sugarcane Devastation : झीलच्या साखरपट्ट्यात गेल्या आठवड्यामध्ये आगीने रौद्ररूप धारण केल्याने सुमारे ५० लाख टन ऊस नष्ट झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
Sugarcane Field Fires
Sugarcane Field FiresAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : ब्राझीलच्या साखरपट्ट्यात गेल्या आठवड्यामध्ये आगीने रौद्ररूप धारण केल्याने सुमारे ५० लाख टन ऊस नष्ट झाल्याची भीती व्यक्त होत आहे. साखर उत्पादनात यंदाही आघाडी घेतलेल्या ब्राझीलला हा मोठा धक्का मानला जात असून यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. ब्राझीलमध्ये यंदा ४६० लाख टन साखरेचे उत्पादन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

भारताचे निर्यात धोरण स्पष्ट नसल्याने व यंदा फक्त ब्राझीलची साखर जादा प्रमाणात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने आंतरराष्ट्रीय साखर बाजार काहीसा मंदीत चालला होता. मात्र अनपेक्षित पणे ब्राझीलच्या ऊस उत्पादक असणाऱ्या साओ पावलो भागामध्ये उष्णता वाढल्याने अचानक तयार उसांना आगी लागल्या.

Sugarcane Field Fires
Sugarcane Fire News : उरळगावात पाच एकर ऊस अज्ञाताने जाळला

आग मोठ्या प्रमाणात धुमसत असल्याने गेल्या चार दिवसांपासून ब्राझीलमध्ये आगीचे तांडव कायम आहे. या आगीमध्ये सुमारे २० हजार हेक्टरमधील दहा लाख टन उसाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. अजूनही आग धुमसत असल्याने उसाचे नुकसान ५० लाख टनापर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

सध्या ब्राझीलचा हंगाम मध्यावर असून सर्व कारखाने वेगाने सुरू आहेत. ऐन भरात साखर उत्पादन सुरू असताना अचानक आलेल्या आगीच्या तांडवाने साखर उद्योग चिंतेत आला आहे. आगीची झळ पोचलेला शिल्लक ऊस तातडीने साखर कारखान्यांना नेण्यासाठी सरकारने उपाययोजना सुरू केल्या आहेत. असे असले तरी मोठ्या आगीमुळे उसाची चिपाडेच राहिल्याने आग लागलेल्या क्षेत्रांमध्ये केवळ २० टक्केच ऊस चांगला राहील, अशी शक्यता तेथील साखर तज्ज्ञांनी व्यक्त केली.

Sugarcane Field Fires
Sugarcane Fertilizers Management : आडसाली उसासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन

आंतरराष्ट्रीय बाजारात दरात वाढ

या सर्वांचा परिणाम म्हणून ऑगस्टमध्ये साखरेचे उत्पादन घटण्यावर झाला आहे. याचा तत्काळ परिणाम आंतरराष्ट्रीय साखर बाजारावर ही झाला आहे. काहीसे मंदीत असणारे आंतरराष्ट्रीय बाजारातील साखर दर चार ते पाच टक्क्यांनी वाढल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. हा बॅकलॉग आता हंगाम सुरू असेपर्यंत तसाच राहील, असेही सांगण्यात आले.

साखर निर्यातीला परवानगी गरजेची

अचानक उद्भवलेल्या परिस्थितीचा लाभ घेण्याची संधी भारताला आलेली आहे, असे साखर उद्योगातून सांगण्यात आले. ब्राझीलची साखर कमी येईल या चर्चेने आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर वाढले. भारत सरकारने तातडीने निर्यातीला परवानगी दिल्यास सध्या जो जादा साखर साठा आहे त्याची निर्यात चांगल्या प्रकारे होऊ शकेल. त्याचा फायदा देशातील कारखान्यांना होऊ शकेल असा अंदाज साखर उद्योगाचा आहे. केंद्राने तातडीने बदलेल्या परिस्थितीचा अभ्यास करून किमान ३० लाख टन साखर निर्यातीला परवानगी द्यावी, अशी मागणी साखर उद्योगाची आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com