POCRA 2.0 : ‘‘पोकरा-२’चा प्रस्ताव केंद्रीय अर्थ व नियोजन खात्याकडे’

POCRA Scheme : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात वातावरणातील बदलाच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आवश्‍यक पूरक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यात बऱ्यापैकी यश आले.
POCRA Project
POCRA ProjectAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : ‘‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात वातावरणातील बदलाच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आवश्‍यक पूरक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यात बऱ्यापैकी यश आले. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्प मंजुरीचा प्रस्ताव केंद्रीय अर्थ आणि नियोजन खात्याला पाठविला आहे,’’ अशी माहिती प्रकल्पाचे संचालक परिमल सिंग यांनी दिली.

नागपूर दौऱ्यावर असलेल्या श्री. सिंग यांनी ‘ॲग्रोवन’शी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘‘पोकरा’च्या पहिल्या टप्प्यात ५२२० गावांचा समावेश होता. ५ हजार ४६९ कोटी रुपयांची तरतूद याकरिता केली होती. प्रकल्पाचे हे अंतिम आणि सहावे वर्ष आहे. जून २०२४ मध्ये प्रकल्पाचा पहिला टप्पा संपेल.

POCRA Project
POCRA : ‘पोकरा’तून अवजारांसाठी दोन वेळा पूर्वसंमती

थकीत अनुदान देण्याची तरतूद केलेली आहे. नव्या अनुदानाची मंजुरी बंद केली आहे. तंत्रज्ञान प्रसारात शेतीशाळांचा उपयोग प्रभावी ठरला. राज्यात तब्बल ३७ हजार शेतीशाळा घेतल्या. शेतीमालाच्या मूल्यवर्धनासाठी राज्यात काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या ३७१ तर इतर ५२० याप्रमाणे ८९१ प्रक्रिया उद्योगांची उभारणी झाली आहे.’’

साठवणुकीची सोय नसल्याने शेतमाल खराब होतो. त्याकरिता गोदाम बांधणीसाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त केले. यातून सुमारे ७८६ गोदामे उभी राहिली आहेत. साडेतीन लाख हेक्‍टर शेती सुक्ष्म सिंचनाखाली आली आहे.

यातून पाणी बचत साधल्याने रब्बी क्षेत्रात वाढ होईल. ४३ हजार शेतकऱ्यांनी फळबाग लावली. १० हजार शेततळी झाली; त्यामध्ये सात हजार नवीन तर तीन हजार शेततळ्यांचे अस्तरीकरण केले. अधिक आणि कमी पावसाच्या काळात पूरक ठरणारे तीन हजारांवर बीबीएफ यंत्र वितरित केली,’’ असेही सिंग म्हणाले.

POCRA Project
POCRA : ‘पोकरा’तून अनुदानित अवजारांना फुटले पाय

‘‘जमिनीचा पोत राखण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. पाच हजार गावांचा जमीन आराखडा तयार केला आहे. लवकरच हे नकाशे ग्रामपंचायतस्तरावर लावण्यात येतील. प्रकल्पात शेतकऱ्यांची नोंदणी ते अनुदान वितरण ही सारी प्रक्रिया ऑनलाइन झाली,’’ असे सिंग यांनी सांगितले. या वेळी प्रकल्पाचे कृषी तज्ज्ञ विजय कोळेकर उपस्थित होते.

‘पोकरा’च्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यांची संख्या वाढविण्या विचार आहे. विदर्भातील सर्व ११, मराठवाड्यातील ८ आणि नाशिक, जळगाव असे २१ जिल्हे राहतील. दुसऱ्या टप्प्यात नव्याने गावांचा समावेश केला जाईल. अहवालास मंजुरी मिळताच प्रकल्पाच्या कार्याला गती येईल.
- परिमल सिंग, संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com