Onion, Grape Farmer : कांदा, द्राक्ष उत्पादकांच्या केंद्राकडे मांडणार

Dada Bhuse : नाशिक येथील डोंगरे वसतिगृह मैदान येथे जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, कृषी विभाग, आत्मा आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्यातर्फे नाशिक कृषी व नवतेजस्विनी महामहोत्सवाचे उद्‍घाटनमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते झाले.
Onion
Onion Agrowon
Published on
Updated on

Nashik News : कांदा व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या निर्याती विषयक काही अडचणी आहेत. या सर्व अडचणी राज्यपातळीवरून केंद्रापर्यंत पोहोचविण्याचे काम शासन हाती घेणार असून, या माध्यमातून सकारात्मक मार्ग काढण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला.

शनिवारी (ता. १०) नाशिक येथील डोंगरे वसतिगृह मैदान येथे जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, कृषी विभाग, आत्मा आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्यातर्फे नाशिक कृषी व नवतेजस्विनी महामहोत्सवाचे उद्‍घाटनमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांच्या हस्ते प्रगतिशील शेतकऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

Onion
Grape Production : ‘बेस्ट ग्रेप’ ब्रॅण्डद्वारे उभारली थेट ग्राहक विक्री व्यवस्था

या वेळी प्रकल्प संचालक (आत्मा) राजेंद्र निकम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, महिला व बाल विकास विभागाचे उपायुक्त चंद्रशेखर पगारे, कृषी विकास अधिकारी कैलास शिरसाट, जिल्हा समन्वय अधिकारी संजय गायकवाड आदी अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

भुसे म्हणाले, की शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रधानमंत्री सम्मान निधी योजना ही केंद्र शासनाच्या माध्यमातून चालवली जात असून, केंद्र शासनाद्वारे ६ हजार व महाराष्ट्र शासनाद्वारे ‘नमो शेतकरी योजना’ राबविण्यात येत असून, या योजनेअंतर्गत सुद्धा वार्षिक ६ हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.

Onion
Onion Export Ban : कांदा निर्यातबंदी मागे घ्या

केंद्र व राज्य शासनाद्वारे एकूण १२ हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. तसेच एक रुपयात पीकविमा देणारे देशात महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. यंदा पाऊस कमी झाला असल्याने पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील पेयजलाचे व शेतीच्या पाण्याचे नियोजनाची कार्यवाही सुरू असून, प्रत्येकाला पुरेसे पाणी मिळावे यासाठी सूक्ष्म नियोजन केले जाईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प संचालक (आत्मा) राजेंद्र निकम यांनी केले.

इगतपुरी येथे १० कोटी रुपयाचे कृषी भवन मंजूर

शेतकऱ्यांच्या सोईसाठी नुकतेच इगतपुरी येथे १० कोटी रुपयांचे कृषी भवन मंजूर झाले आहेत. तसेच मालेगाव येथे पाच कृषी महाविद्यालये मंजूर असून त्याचेही काम प्रगतीपथावर आहे. या कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार असून त्याचे चांगले परिणाम येत्या काळात दिसून येतील,असा विश्वास भुसे यांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com