Fodder Issue : बळीराजाची गुरे जगविण्यासाठी धडपड चाऱ्याची समस्या गंभीर

Fodder Shortage : या उन्हाळ्यात दुष्काळजन्य स्थिती, पशुखाद्याचे व चाऱ्यांचे वाढलेले भाव, या विविध कारणांमुळे गुरांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे.
Fodder Issue
Fodder IssueAgrowon

Jalgaon News : यावर्षी चाळीसगाव तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परीस्थितीत शेतकरी मात्र रडकुंडीला आला आहे. शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेला चारा संपत आल्याने चाराटंचाईने शेतकरी पशुपालक त्रस्त झाले आहेत. या उन्हाळ्यात दुष्काळजन्य स्थिती, पशुखाद्याचे व चाऱ्यांचे वाढलेले भाव, या विविध कारणांमुळे गुरांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे.

या भागात आलेले काठेवाडी, मेढपाळांनाही दुष्काळाच्या झळा बसत आहेत. शासनाने ज्या भागात चाराटंचाई आहे, अशा भागात लवकरात लवकर चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे. राज्यात सर्वत्र दुष्काळाचे चटके बसत असून, चारा व पाण्याची टंचाई भासू लागली आहे.

Fodder Issue
Fodder Ban : कडब्यावरील जिल्हाबंदीने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडे

त्याला आता गिरणा परिसर देखील अपवाद राहिलेला नाही. या भागाला गिरणा नदी वरदान ठरल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी ऊस व केळीची लागवड केली आहे. पाण्याअभावी सद्यःस्थितीत कच्च्यापक्क्या उसाची तोड करून विक्री केली जात आहे. उसाच्या चाऱ्याच्या खरेदीला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. चारा म्हणून विकला जाणारा ऊस किमान २ हजार ६०० रुपये तर कमाल २ हजार ८०० रुपये टन दराने विकला जात आहे.

जेमतेम शिल्लक चारा

उसाची बांडी व पाचटसह वजन केले जात असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत आहे. काहींनी तीन हजार रुपये दराचा भाव मिळेल या आशेने ऊस विकला जाईल, यासाठी उसाचे क्षेत्र राखून ठेवले आहे. हा चारा धुळे जिल्ह्यातील शिरूड, तरवाडे, मालेगाव व नाशिक जिल्ह्यातील शेतकरी सध्या घेऊन जाताना दिसत असले तरी तो देखील जेमतेम आहे. यावर्षी चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक चाराटंचाई निर्माण झाली आहे. प्रशासनाने चाराटंचाई संदर्भात तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

Fodder Issue
Fodder Shortage : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ११.८७ लाख टन चाऱ्याची उपलब्धता

जनावरांची संख्या घटली

दुष्काळी परिस्थितीमुळे चाऱ्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. त्याचा थेट फटका गायी, म्हशी, बैलांसारख्या गुरांना बसत आहे. या गंभीर परिस्थितीत रोजच्या रोज पशुखाद्याचे व चाऱ्यांचे भाव वाढत आहेत. या अशा कारणांमुळे जनावरांची संख्या घटत आहे. ग्रामीण भागात २०१२ च्या पशु गणनेनुसार गाय, म्हैस, बैल, शेळ्यांसह इतर पाळीव प्राण्यांची संख्या १ लाख ६५ हजार ८१९ आहे.

वडगाव लांबे (ता. चाळीसगाव) येथील गोशाळेवर गोसेवक रविदास महाराज यांना सध्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे तेथे गाईंची सेवा करणारे अमोल महाराज यांना सध्या चाऱ्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ज्या भागात चारा टंचाईची स्थिती गंभीर आहे, अशा ठिकाणी प्रशासनाने चाऱ्याची छावण्या तत्काळ सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com