Pune News : राज्यासह देशातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेती आणि वीजनिर्मितीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. देशातील १५० जलाशयांच्या जलसाठ्यात यंदा ५७.९९३ बीसीएम जलसाठा शिल्लक असल्याने केंद्रीय जल आयोगाने स्पष्ट केले आहे. तसेच राज्याच्या जलसंपदा विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील सर्व १३८ मोठ्या प्रकल्पात २२.५२ टक्के पाणीसाठा शिल्लक असून हाच साठा गेल्यावर्षी ३३.५४ टक्के होता. सध्या या जलाशयांमध्ये १२, ०८०.८१ (द.ल.घ.मी) पाणीसाठा असून उपयुक्त पाणीसाठी ६५४४.९४ ८१ (द.ल.घ.मी) पाणीसाठा शिल्लक आहे.
देशात गेल्या वर्षी अल निनोचा प्रभाव पडल्याने पाऊस म्हणावा तसा झाला नाही. यामुळे अनेक धरणे पुर्ण क्षमतेने भरलीच नाहीत. राज्यात देखील याचा फटका बसला. यामुळे राज्यातील धरणे आता कोरडी पडत चालली आहेत. राज्यातील एकूण सहा विभागातील सर्व २९९४ धरणातील पाणीसाठा २४.७४ टक्क्यांवर आला आहे. जो गेल्या वर्षी ३३. ५४ टक्के होता.
राज्यात नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि कोकण असे सहा विभाग असून २६० मध्यम प्रकल्पात आज फक्त ३४.०९ टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. जो गेल्या वर्षी ४७.४५ टक्के होता. तर २५९६ असणाऱ्या लहू प्रकल्पातील पाणीसाठा २६.९४ टक्क्यांवर आला असून तो गेल्या वर्षी ३६.४३ टक्क्यांवर होता.
यंदा वाढत्या उन्हाचा फटका मोठ्या धरणातील पाण्यासाठ्यांना बसत आहे. बाष्पीभवनासह शेतीचे आवर्तण आणि वीजनिर्मितीसाठी पाणी वापरले जात आहे. केंद्रीय जल आयोगाने (CWC) साप्ताहिक बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, देशातील प्रमुख जलाशयांच्या पाणीसाठ्यात घट झाली असून सध्या एकूण साठवण क्षमतेच्या केवळ २५ टक्के पाणीसासाठी शिल्लक आहे.
सध्या देशातील १५० प्रमुख जलाशयांमध्ये ४५.२७७ अब्ज घनमीटर पाणी आहे. तसेच या १५० प्रमुख जलाशयांमध्ये २० जलविद्युत प्रकल्पांचा समावेश असून यांची साठवण क्षमता ३५.२९९ बीसीएम आहे. केंद्रीय जल आयोगाने दिलेला अहवालात १० ते १६ दरम्यानचा असून यंदा पाणीसाठी २५ टक्क्यांवर आला असून तो मागील वर्षी याच कालावधीत ५७.९९३ बीसीएम होता.
आयोगाच्या अहवालानुसार, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि राजस्थानच्या उत्तरेकडील प्रदेशातील १० जलाशयांची एकूण साठवण क्षमता १९.६६३ बीसीएम असून येथे सध्या ५.६१८ बीसीएम पाणीसाठा आहे. जो क्षमतेच्या २९ टक्के इतकाच आहे. तर तो गेल्या वर्षीच्या तुलनेत ३७ टक्क्यांनी कमी आहे.
आसाम, झारखंड, ओडिशा, पी. बंगाल, त्रिपुरा, नागालँड आणि बिहारमध्ये २०.४३० बीसीएम क्षमतेचे २३ जलाशय असून येथे सध्या ६.५३१ बीसीएम जलसाठा शिल्लक आहे. जो ३१.९७ टक्के आहे. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला असून गेल्या वर्षी फक्त २८ टक्के पाणीसाठा होता.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.