Vikhe Thorat Political Conflict : विखे-थोरांताच्या तिसऱ्या पिढीतील राजकीय संघर्षही तीव्र

Political Update : महाराष्ट्राच्या राजकारणात अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख असलेल्या विखे-थोरात कुटुंबांतील राजकीय संघर्ष जुनाच आहे.
Radhakrishna Vikhe vs Balasaheb Thorat
Radhakrishna Vikhe vs Balasaheb ThoratAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : महाराष्ट्राच्या राजकारणात अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख असलेल्या विखे-थोरात कुटुंबांतील राजकीय संघर्ष जुनाच आहे. आतापर्यंत दोन्ही बाजूंनी मर्यादा राखून सुरू असलेला हा संघर्ष तिसऱ्या पिढीपर्यंत आला. मात्र नव्या पिढीतील अधिक आक्रमकतेमुळे वादाची नव्याने ठिणगी पडली. केवळ विरोधाला विरोध म्हणून सुरू असलेला हा संघर्ष आता अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे.

स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील दोघेही काँग्रेसमध्ये असल्यापासून हा संघर्ष आहे. आपापल्या काळात एकमेकांची ‘यंत्रणा’ मोडीत काढण्याचे प्रयत्न झाले. हे खरे वाद वाढण्याचे कारण आहे. लोकसभेला माजी खासदार डॉ. सुजय विखे यांचा पराभव करत खासदार नीलेश लंके यांना मदत केली; म्हणून डॉ. विखेंनी संगमनेर तालुक्यात लक्ष घालून विधानसभा निवडणुकीत थोरातांची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू केले.

Radhakrishna Vikhe vs Balasaheb Thorat
Maharashtra Assembly Election : मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांचे अर्ज दाखल

डॉ. जयश्री थोरात यांनी तालुक्यात ‘युवा संवाद यात्रा’ सुरू करताच डॉ. विखे यांनीही संगमनेरला तालुक्यात ‘युवा संकल्प यात्रा’ सुरू केली. धांदरफळच्या सभेत वसंत देशमुखांनी डॉ. जयश्री यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून वादाला तोंड फोडले. थोरात समर्थकांनी डॉ. विखे यांना तालुक्यात येण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

Radhakrishna Vikhe vs Balasaheb Thorat
Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

स्वतः थोरातांनी विखेंवर थेट टीका केली. तर स्वतः राधाकृष्ण विखे यांनी संगमनेरमध्ये जाऊन रविवारी (ता. २७) निषेध सभा घेतली. या राजकीय वादात थोरात आणि विखे ही दोन्ही कुटुंबे आपल्या सदस्याच्या पाठीशी उभे राहण्यासाठी ठामपणे पुढे आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे थोरात-विखे यांचा राजकीय संघर्ष आता अधिक तीव्र होत आहे.

संघर्षाचे मूळ कारण काय?

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे, स्व. भाऊसाहेब थोरात यांच्या सहकार चळवळीतून अनेक कुटुंबे उभी राहिली. पुढे दोन्ही कुटुंबांतील प्रमुख राजकारणात आले. पद्मभूषण स्व. बाळासाहेब विखे पाटील व स्व. भाऊसाहेब थोरात यांच्यापासून दोन्ही कुटुंबांत राजकीय संघर्ष सुरू झाला. तिसऱ्या पिढीवर आलेला हा राजकीय संघर्ष यंदा अधिक तीव्र झाला आहे. मात्र पद्मभूषण स्व. बाळासाहेब विखे पाटील व स्व. भाऊसाहेब थोरात यांच्यापासून सुरू झालेल्या या राजकीय संघर्षाचे मूळ कारण काय असा प्रश्न नव्या पिढीला नक्कीच पडलेला आहे. जुन्या काळातील या दोघांची भाषणे एकली तर नक्कीच संघर्षाचे मूळ सापडेल, असे राजकीय जाणकार सांगतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com