Lokhandi Nangar: लोखंडी नांगराचा चित्र पुढच्या पिढ्यांना दाखवावं लागेल...

Rural Farming: लोखंडी नांगराने कृषी क्षेत्रात केलेल्या क्रांतीची आठवण ठेवणं गरजेचं आहे, कारण त्याने शेतकऱ्यांच्या कष्टात मोठा दिलासा दिला. भाऊराव पाटलांच्या कष्टांनी लोकशिक्षणापर्यंतचा प्रवास घडवला, तर आज बैलांपासून ट्रॅक्टरपर्यंतच्या शेतीतील बदलांची कहाणी मोघडा आणि पावसाच्या खेळीमध्ये दिसून येते.
Agriculture
Agriculture Agrowon
Published on
Updated on

लक्ष्मण खेडकर

Maharashtra Agriculture:

लोखंडी नांगर

ट्रॅक्टरने शेत नांगरणाऱ्या आजच्या पिढीला सांगायला गेलो तर त्यांना खरं वाटणार आणि पटणार ही नाही, एकेकाळी ह्या नांगराने कृषी क्षेत्रात खूप मोठी क्रांती केली होती. ह्याने शेतीतून समृद्धी वगैरै येवून शेतकऱ्यांची भरभराट झाली नसली तरी, शेतकऱ्यांचं कष्ट थोडं हलकं आणि सोपं झालं होतं. किर्लोस्कर कंपनीत कामाला असताना कंपनीने तयार केलेले नांगर भाऊराव पाटलांनी वेळ प्रसंगी आपल्या खांद्यावर वाहून नेहून त्यांची जाहिरात करून त्याची विक्री ही केली.

हे करत असताना गाव खेड्यातील माणसांचे हाल अपेष्टांने भरलेले जीवन भाऊराव पाटलांना अगदी जवळून पाहायला मिळाले. यातूनच बहुजनाच्या लेकरांसाठी शाळा कॉलेज आणि बोर्डींग सुरू करण्याची त्यांनी मनाशी खूणगाठ बांधली. त्यांनी ते काम रयत संस्थेची स्थापना करून हाती घेतले. एकीकडे लोखंडी औजारे वापरून शेती आणि दुसरीकडे गाव खेड्यातील लेकरांना शिक्षण हे त्या काळात सुरू झालं. शेतीतून नाही तर शिक्षणातून अनेक लेकरं पुढं आली आणि त्यांनी त्यांच्या शेतकरी आईबापाचे पांग फेडले.

Agriculture
Agriculture Sowing: यंदा पेरणीचा खर्च वाढला

पुढं बैलांची संख्या कमी होत गेली आणि शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरं आले. तसे बैलांने शेत नांगरने संपुष्टात आलं. आमच्या आधीच्या दोन पिढ्या आणि आमच्या पिढीचे खूप रंजक किस्से आणि कटू अनुभव आहेत, नांगर आणि नांगरटीच्या दिवसाचे, फाळ, फळी, चाक, कडी, आडाळं, वढ, चाव्हर, शिवळाट शिवळा, सावड, इर्जिक ह्या आणि अशा कित्येक गोष्टी नांगरासोबत लोप पावल्या उद्याच्या येणाऱ्या पिढ्याला हा नांगर चित्रातचं दाखवावा लागेल.

मोघडा

सकाळी सहाला जुंपले की दहा वाजेपर्यंत हाकीत असतोय. काल अर्ध राहिलेलं तुरीवालं उरकून, खालच्या खोलग्यातली वाटणी घेवून वाहिरीवाल्या वावरात आलो होतो. ते ही अर्धकसं उरकिलं होतं, नऊ साडेनऊच्या दरम्यान असचं पाणी प्यायला म्हणून थांबलो होतो. झाडाखाली ठेवलेल्या पाण्याच्या कळशीकडं जावून पाणी पिऊस्तोर इकडं बैलांने औत ओढीत विहिर गाठली आणि आत डोकावून पाहू लागले.

Agriculture
Rural Development : ग्रामविकासातील लोकसहभाग महत्त्वाचा

एवरी थांबवल्यावर जागच्या जागी रवंथ करत थांबणारे बैलं, मला पाणी पिऊन येऊस्तोर थेट विहिरीकडं गेलेले पाहून माझ्या लक्षात आलं. ओली माती ओढून ते ही बिचारे तान्हेलेले दिसताहेत, घेतले वळून अन दिले सोडून, गेलो पाण्यावर घेवून, पाणी पाजले, झाडाच्या सावलीला नेहून बांधले. टाकला भाराभर कडबा कातरून अन ‌‌बसलो न्याहारी घेवून याणा-याच्या वाटेकडे डोळे लावून.

काल परवा आणि त्याच्या आधी थोडासा पाऊस झालता म्हणलं वल्यात वले ढेकळं जरा फुटतील म्हणून मोघडा धरला पण वली माती वढायला न्याट लागतंय, तास दिड तास झालं चलतेत म्हणलं दमले असतेल म्हणून थोडा इसावा घ्यावा म्हणून मोघडा उभा केला अन मी ही आपला बसलो तिथचं ढेकळात पाय पसरून.

Agriculture
Rural Story: मातीशी एकरूप झालेलं गाव...

बसल्या बसल्या किती वाजलेत पाहाण्यासाठी खिशातला मोबाईल काढला तर बैलं मान वाकडी करून मागं वळून पाहातोय "मालक आराम करतोय की मोबाईल बघतोय म्हणून" आपण इतरांच्या भल्याचा इचार करायला जावा अन त्याने आपल्याकडचं असं संशयाने पाहावा हे काय बरं नाही, ठरलं होतं तासभर हाकून सोडून द्यायचे पण आता दुपारपोस्तर सुट्टीच नाही बघा खंडेराव, अख्खं वावार होऊसतोर..

पावसाची खेळी

रात्री थोडा पाऊस झाल्यामुळे सकाळच्या सत्राचा सगळा खेळ वाया गेला. दुपारी लंच नंतर जो खेळ सुरू झालाय तो अद्यापपर्यंत सुरूय, मध्ये एक दोनदा ड्रिंक ब्रेक घेतलाय तेवढाच काय तो विसावा, बाकी गेल्या अडीच तीन तासांपासून पिचवर उभेहेत ,सगळा माळ खालीय प्रेक्षक म्हणून कुणी ही नाहीय ,झाडावरले पाखरं तेवढे अधूनमधून चिअर अप करताहेत, ढग वाकुल्या दाखवत उरावून निघून जात आहेत, फोर, सिक्स मारण्यासारखी आज परिस्थिती नाहीय.

टिकून खेळतांना कसोटी लागतीय इकडं, सिंगल डबल करत करत ह्या बांधापासून त्या बांधापर्यंत आतापोस्तोर आम्ही तिघाने मिळून शे दिडशे धावा काढल्या असतील? स्कोअर लिहायला कुणी नसल्यामुळे निश्चित अशा सांगता येणार नाहीत पण शतक पूर्ण होऊन पुढ काही तरी झाल्या असतील, पाऊसाने खेळ थांबवला नाही तर पुढचे दोन अडीच घंटे आहोत आम्ही मैदानात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com