Agriculture Sowing: यंदा पेरणीचा खर्च वाढला

Fertilizer Price Hike: यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतांच्या वाढलेल्या किमतींचा फटका बसणार आहे. सबसीडी कपात झाल्याने पेरणीचा खर्च वाढला असून, अर्थचक्र कोलमडण्याची चिन्हं आहेत.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon
Published on
Updated on

Amaravati News: यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या पेरणीचे अर्थचक्र बिघडण्याची शक्यता वाढली आहे. रासायनिक खतांवरील सबसीडीत कपात करण्यात आल्याने खतांच्या किमती वाढल्याचे दावे कंपनीने केले आहेत. तथापि, खतांच्या दरवाढीने पेरणीच्या खर्चात चांगलीच वाढ होणार आहे.

पुढील महिन्यापासून खरीप हंगामाच्या पेरणीस प्रारंभ होणार आहे. शेतीच्या पेरणीपूर्व मशागतीस प्रारंभ झाला असून शेतकऱ्यांचे पेरणीचे नियोजन सुरू झाले आहे. पेरणीच्या कालावधीत खतांची मागणी शेतकऱ्यांकडून वाढते. यंदा मात्र आवश्यक असलेल्या युरियाव्यतिरिक्त जवळपास सर्वच रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाली आहे.

१० ः २६ः २६ या खताच्या किमतीत यंदा तब्बल अडीचशे रुपयांनी वाढ नोंदविण्यात आली आहे. पूर्वी या खताची एक बॅग १४७० रुपयांना मिळत होती, ती यंदा १७२० रुपयांना विकत घ्यावी लागणार आहे. ९९ सिंगल सुपर फॉस्पेटच्या किमतीत ७० ते ८० रुपयांनी वाढ झाली आहे.

Kharif Sowing
Kharif Season Preparation : मॉन्सूनपूर्व पावसामुळे सांगलीत पूर्व मशागती सुरू

जवळपास सर्वच रासायनिक खतांच्या किमती सरासरी १०० रुपयांनी, तर काही खतांच्या किमती २५० ते ३०० रुपयांनी वाढल्या आहेत. खरिपात सोयाबीन, कापूस व तूर ही मुख्य पिके असतात. या पिकांच्या पेरणीच्या वेळी शेतकरी वाढ जोमाने व्हावी, यासाठी खतांच्या मात्रा देतात. कोरडवाहू पट्ट्यात कापूस हे मुख्य व नगदी पीक असून पेरणीक्षेत्र अधिक राहते.

कपाशीच्या बियाण्यांच्या किमतीत वाढ झाली असताना आता खतांच्याही किमती वाढल्याने शेतकऱ्यांचा पेरणीचाच खर्च वाढणार आहे. त्यामुळे एकरी उत्पादनाच्या खर्चात वाढ झाली असून पेरणीचे शेतकऱ्यांचे अर्थचक्र यामुळे बिघडणार आहे. खतांवरील सबसीडीत कपात करण्यात आल्याने त्याचा परिणाम किमती वाढण्यात झाल्याचे खत उत्पादक कंपनीचा दावा आहे.

Kharif Sowing
Kharif Season 2025: खरिपासाठी विविध प्रकारचे बियाणे उपलब्ध

अशा वाढल्या किमती

रासायनिक खत-पूर्वीचे दर ः आताचे दर ः वाढ

१८-१८ः१० - १२०० ः १३०० ः १००

२०ः२०ः०० ः १३ - १२५० ः १३५० ः १००

१२ः३२ ः११ - १४७० ः १७५० ः २८०

१९ः१९ः१९ - १६०० ः १८०० ः १००

२४ः२४ः००- १७००ः १८५० ः १५०

१०ः२६ः२६ - १४७० ः १७२० ः २५०

सबसीडीसाठी फार्मर आयडी अनिवार्य

विक्रेत्यांकडून खते विकत घेताना शेतकऱ्यांना फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. त्यासाठी त्यांना विक्रेत्यांकडील पॉस मशिनवर थंब द्यावा लागणार असून त्यानंतरच शेतकऱ्यांना सबसीडी मिळणार आहे.

खरीप पेरणीच्या अनुषंगाने नुकताच राज्यभरातील आढावा घेतला. शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार खतांचा पुरवठा होईल, असे नियोजन केले आहे. यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील शेतकऱ्यांसाठी जवळपास ४७ लाख टन खत मंजूर आहे. त्यातील २६ लाख टन खत सध्या आपल्याकडे उपलब्ध आहे. यंदा तीन मित्र खते सोडली तर बाकीच्या खतांच्या किमती स्थिर आहेत.
सुनील बोरकर, संचालक, कृषी (गुणनियंत्रण)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com