Soybean
SoybeanAgrowon

Crop Insurance : परभणी जिल्ह्यातील सोयाबीनचे प्रलंबित पीकविमा दावे अदा करा

National Technical Advisory Committee : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत २०२१ च्या खरीप हंगामातील परभणी जिल्ह्यातील पात्र मंडळांतील शेतकऱ्यांचे प्रलंबित विमा दावे आठवडाभरात अदा करण्याबाबतचे आदेश शनिवारी (ता. २४)राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीने काढले आहेत.
Published on

Parbhani News : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत २०२१ च्या खरीप हंगामातील परभणी जिल्ह्यातील पात्र मंडळांतील शेतकऱ्यांचे  प्रलंबित विमा दावे आठवडाभरात अदा करण्याबाबतचे आदेश शनिवारी (ता. २४)राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीने काढले आहेत.

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याणमंत्री शिवराजसिंह चौहान बुधवारी (ता. २१) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना त्यांनी नांदेड येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला.

Soybean
Soybean Production : सुधारित तंत्राच्या वापरातून सोयाबीन उत्पादनात वाढ

या वेळी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी २०२१ च्या खरीप हंगामातील सोयाबीनचे पीकविमा दावे प्रलंबित असल्याची समस्या चौहान यांना सांगितली. या संदर्भात चौहान यांनी कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयातील अधिकाऱ्यांना तत्काळ या समस्येचे निवारण करण्याचे आदेश दिले होते.

Soybean
Soybean Pest infestation : सोयाबीनवर पाने, शेंगा खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव

या संदर्भात गुरुवारी (ता. २२) राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली. या वेळी  पीक कापणी प्रयोगावर आधारित पात्र मंडळातील शेतकऱ्यांना प्रलंबित पीकविमा दावे अदा करण्याचे आदेश विमा कंपनीला दिले.

या निर्णयामुळे परभणी जिल्ह्यातील विविध मंडळांतील सुमारे २ लाख पीकविमाधारक शेतकऱ्यांना सुमारे २०० ते २२५ कोटी रुपयांचे विमा दावे मिळण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com