Crop Insurance : अमरावती जिल्ह्यातील चार टक्के कर्जदार शेतकऱ्यांचा सहभाग

Debtor Farmer : केंद्रीय कृषी मंत्रालयाने ही मुदत वाढवत असताना योजनेत सहभाग घेण्यासाठी अर्ज संबंधित बॅंकेतूनच भरण्याचीही अट घातली आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

Amaravati News : प्रधानमंत्री पीकविमा योजनेतील कर्जदार शेतकऱ्यांचे प्रमाण नगण्य आहे. ३१ जुलै या मुदतीपर्यंत जिल्ह्यातील कर्जदार शेतकऱ्यांचे या योजनेतील प्रमाण ४.३६ टक्के असून ही टक्केवारी वाढविण्यासाठी आता २५ ऑगस्टपर्यंत पीकविमा भरण्याची मुदत वाढविली आहे.

केंद्रीय कृषी मंत्रालयाने ही मुदत वाढवत असताना योजनेत सहभाग घेण्यासाठी अर्ज संबंधित बॅंकेतूनच भरण्याचीही अट घातली आहे. विमा कंपनीला ९ सप्टेंबरपर्यंत पात्र शेतकऱ्यांचा डेटाएंट्री करण्यास मुभा दिली आहे. दरम्यान जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत ४ हजार ५४ कर्जदार शेतकऱ्यांनीच सहभाग घेतला आहे.

Crop Insurance
Crop Insurance Issue : पीककर्जासाठी परळी तहसीलसमोर निदर्शने

एक रूपयांत पीकविमा काढण्याची सुविधा राज्य सरकारने दिल्यानंतरही या खरीप हंगामात शेतकऱ्यांना या योजनेला अपेक्षित प्रतिसाद दिलेला नाही. २ लाख ३१ हजार २३३ शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग घेतला असून त्यामध्ये कर्जदार प्रकरणांची संख्या केवळ ४ हजार ५४ इतकीच आहे. कर्जदार शेतकऱ्यांचा या योजनेतील सहभाग वाढावा यासाठी २५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गतवर्षीच्या हंगामातही कर्जदार शेतकऱ्यांची विमा प्रकरणांची संख्या ४ हजार १६६ इतकीच होती.

Crop Insurance
Crop Insurance Return : सहा लाख शेतकऱ्यांना ८५३ कोटींचा विमा परतावा

कर्जदार शेतकऱ्यांची रोडावलेली संख्या बघता त्यांचा सहभाग वाढावा यासाठी राज्याने केलेल्या विनंतीवरून केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे. ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यातील २ लाख ३५ हजार ५६ शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग नोंदवत प्रीमियम भरला.

यामध्ये बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या अर्जांची संख्या ४ लाख ७० हजार ४७५ इतकी असली तरी कर्जदार शेतकऱ्यांकडून केवळ ४,०५४ अर्ज दाखल झाले आहेत. खरीप हंगामात शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसह राष्ट्रीय, खासगी व ग्रामीण बॅंकेकडून पीक कर्ज घेतात. या वर्षीच्या हंगामात जिल्ह्यातील ९२ हजार ८१८ शेतकऱ्यांनी ११९१ कोटी ६६ लाख रुपयांचे पीककर्ज घेतले आहे. या तुलनेत पीकविमा योजनेतील कर्जदार शेतकऱ्यांच्या सहभागाचे प्रमाण सरासरी ४.३६ टक्के आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com