Nashik News : आदिवासी विकास महामंडळाने बाळहिरडा खरेदी पूर्ववत करण्यासह नुकसान भरपाईच्या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेतर्फे सोमवारी (ता. ९) बाळहिरडा उत्पादक शेतकऱ्यांनी आदिवासी विकास आयुक्तालयात ठिय्या आंदोलन सुरू केले. भरपाईप्रश्नावर खात्याच्या मंत्र्यांची तारीख मिळत नाही, तोपर्यंत जिल्हा रुग्णालयासमोर मुक्काम आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर व खेड तसेच अहमदनगर जिल्ह्यांतील अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे मुख्य उत्पन्नाचे साधन बाळहिरडा हे गौण वन-उपज आहे. त्याची खरेदी आदिवासी विकास महामंडळ करत असे. परंतु चार वर्षांपासून खरेदी करणे थांबवली आहे. तसेच चक्रीवादळात बाळहिरड्याचे नुकसान झाले होते. पंचनामे केले होते, परंतु ही नुकसानभरपाई अद्याप मिळाली नाही, ही त्वरित मिळावी ही प्रमुख मागणी आहे.
सोमवारी (ता. ९) महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांच्या अखत्यारित हिरडा खरेदी व हमीभाव विषयांवर चर्चा झाली. किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, सिटू कामगार संघटनेचे राज्याचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, किसन गुजर, सुनील मालुसरे, अमोल वाघमारे, अशोक पेकारी, राजू घोडे, नामदेव भांगरे, लक्ष्मण जोशी आदी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.