Latur Gramin Assembly : गेल्या निवडणुकीतील चूक आता नाही : लोणीकर

Babanraon Lonikar : लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात गेल्या वेळी भाजपचा विजय निश्चित होता, मात्र काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यात छुपा समझोता झाल्याने हा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला गेला.
Babanraon Lonikar
Babanraon LonikarAgrowon
Published on
Updated on

Latur News : लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात गेल्या वेळी भाजपचा विजय निश्चित होता, मात्र काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यात छुपा समझोता झाल्याने हा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. मागील चूक या वेळी होणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत लातूर ग्रामीण भाजपचाच असेल आणि भाजपच ताकदीने निवडणूक लढवेल, अशी माहिती पक्ष निरीक्षक माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी येथे दिली.

लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातून भाजपकडून उमेदवारी कोणाला द्यावी यासाठी निरीक्षक माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी मंगळवारी दुपारी संवाद कार्यालयात पक्ष पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्रत्येकाची भावना जाणून घेतली. यावेळी बहुतांशी पक्षाच्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी आमदार रमेश कराड यांनाच लातूर ग्रामीण मतदार संघातून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केली.

Babanraon Lonikar
Latur Green Festival : लातूरच्या हरितोत्सवात लाखो रोपांची विक्री

या वेळी आमदार रमेश कराड, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम शिंदे, पंचायतराज सेलचे जिल्हा संयोजक नवनाथ भोसले, विधानसभा अध्यक्ष अनिल भिसे, लातूर तालुका अध्यक्ष बन्सी भिसे, रेणापूर तालुका अध्यक्ष दशरथ सरवदे उपस्थित होते.

लातूर ग्रामीण भाजपचा बालेकिल्ला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत ही जागा भाजपने लढवली असती तर निश्चितपणे एक भाजपचा आमदार वाढला असता. मागील वेळी झालेली चूक या वेळी होणार नाही. लातूर ग्रामीणची जागा भाजपकडेच असेल आणि ताकदीने लढवेल असे लोणीकर म्हणाले.

Babanraon Lonikar
Latur DCC Bank : लातूर जिल्हा बँकच राज्यात नंबर वन

काँग्रेसच्या कार्यकाळात लातूर जिल्ह्याने देश आणि राज्य पातळीवरील मोठ मोठी पदे मिळून दीर्घकाळ सत्ता उपभोगली. तरीही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला नाही, अशी टीका त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोककल्याणकारी योजना राबविल्या. देशाच्या सर्वांगीण विकास कामाचे उच्चांक निर्माण केले.

मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. काँग्रेस आघाडी संविधान बदलणार असे नरेटिव्ह करून मतदारांत संभ्रम निर्माण करण्यात यशस्वी ठरली. मराठा-ओबीसी यांच्यात वाद लावण्यात ते यशस्वी झाले. या निवडणुकीत सावध राहावे, असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com