Latur DCC Bank : लातूर जिल्हा बँकच राज्यात नंबर वन

Loan Disbursement : बिनव्याजी पाच लाखांचे कर्ज देणारी लातूर ही देशातील पहिली जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. राज्यातील अन्य बँकांनी महिन्यातच पाच लाखांच्या बिनव्याजी कर्जाच्या निर्णयातून माघार घेतली.
Latur DCC Bank
Latur DCC BankAgrowon
Published on
Updated on

Latur News : बिनव्याजी पाच लाखांचे कर्ज देणारी लातूर ही देशातील पहिली जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. राज्यातील अन्य बँकांनी महिन्यातच पाच लाखांच्या बिनव्याजी कर्जाच्या निर्णयातून माघार घेतली. जिल्हा बँकेने निर्णयाची अंमलबजावणी करत या कर्जावरील अडीच कोटींचे व्याज बँकेने नफ्यातून भरले.

एकदा शेतकऱ्यांसाठी उचलले पाऊल कधीच मागे घेतले नाही. पुणे बँकेची कार्यक्षेत्र, ठेवी व उलाढाल पाहता लातूर जिल्हा बँकेने आटोपशीरपणे काम आर्थिक शिस्त पाळत पुणे बँकेएवढाच नफा मिळवला. यामुळे आर्थिक शिस्त पाळण्यात लातूर जिल्हा बँक पुणे बँकेच्या पुढे असून, राज्यात नव्हे तर ती देशात नंबर एकच आहे, असा विश्‍वास माजी मंत्री सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांनी व्यक्त केला.

Latur DCC Bank
Crop Loan : व्यवस्था बदलाने वाढेल पीककर्ज टक्का

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गुरुवारी (ता. १२) आयोजित ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार अमित देशमुख, बँकेचे अध्यक्ष आमदार धीरज देशमुख, आमदार बाबासाहेब पाटील, माजी आमदार वैजनाथ शिंदे, अशोक पाटील निलंगेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. दिलीपराव देशमुख म्हणाले, की शेतकऱ्यांना मुलींच्या लग्नासाठी कर्ज देणारी शुभमंगल योजना राबविणारी एकमेव जिल्हा बँक आहे. सहकारातील दोषांची चर्चा होते.

चांगल्या घडामोडींची चर्चा होत नाही, ही खंत आहे. सहकारातून शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धीचा यशवंतराव चव्हाणांना दिलेला मंत्र व विचार प्रत्यक्षात आणण्याचे आणि लोकनेते विलासराव देशमुख यांचे स्वप्न तडीस नेण्याचे काम बँकेने केले. यामुळे पुरस्कार देणारे आमच्या शोधात आहेत. शेजारी जिल्ह्यातील जिल्हा बँकांची अवस्था पाहिली तर लातूर जिल्हा बँक आज दिमाखाने उभी आहे, याचे श्रेय दिलीपराव देशमुख यांना असल्याचे अमित देशमुख म्हणाले.

Latur DCC Bank
Crop Loan : राष्ट्रीयीकृत, खासगी बँकांचा पीककर्ज वाटपात हात आखडता

शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून जिल्हा बँक काम करत असल्याचे खासदार डॉ. काळगे यांनी सांगितले. पीककर्जाचा व्याजासह भरण्याची अट घातली तरी ९६ टक्के कर्ज वसुली करून बँकेने त्यावर मात केल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. सोयाबीनच्या हार्वेस्टरसाठीही बँकेने कर्ज देण्याची मागणी निलंगेकर यांनी केली. या वेळी बँकेचे संचालक, अधिकारी, गटसचिव, संस्थांचे अध्यक्ष, शेतकरी सभासद उपस्थित होते. सचिन सूर्यवंशी व राहुल इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यकारी संचालक हणमंत जाधव यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. संचालक एन. आर. पाटील यांनी अनुमोदन दिले. आभार प्रमोद जाधव यांनी मानले.

वार्षिक सर्वसाधारण सभेतील घोषणा

उसाप्रमाणे सोयाबीनच्या छोट्या हार्वेस्टरसाठी अर्थसाह्य देणार

रेशीम चॉकी सेंटरला बिनव्याजी कर्जपुरवठा करणार

पगारदार कर्मचाऱ्यांना साडेदहा टक्क्यांनी कर्ज पुरवठा. अर्धा टक्का व्याज कपात

बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही शुभमंगल व शैक्षणिक कर्ज योजना लागू

सहकारी तत्त्वांवर हॉस्पिटल सुरू केल्यास शंभर कोटीचे कर्ज

विविध कार्यकारी, मजुर, पगारदार व सहकारी संस्थांच्या चेअरमनना मोबाईल

जिल्हा बँक कर्मचारी आणि गट सचिवांना २५ टक्के बोनस. त्यासाठी साडेदहा कोटीची तरतूद

शेतकऱ्यांच्या मुलांना खासगी उद्योगासाठी कर्ज देण्याच्या योजनेवर विचार करून लवकरच निर्णय

पिकांची हेक्टरी कर्जमर्यादा वाढवून बँकेने उच्चांकी अठराशे कोटी रुपयांचे कर्जवाटप केले. बँक खात्यासाठी किमान रकमेची सक्ती न करता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी ३२ हजार महिलांची खाते उघडली. आम्हाला इथेच थांबायचे नाही. आणखी पुढे जायचे आहे. राष्ट्रीयीकृत बँकेशी स्पर्धा करत शेती व्यवसायातील गरजा लक्षात घेऊन व यांत्रिकरणासाठी कर्जपुरवठा करायचा आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व घटकांतील लोकांनी बँकेत ठेवी गुंतवाव्यात.
- धीरज देशमुख, आमदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com