Summer Heat : लाखणगावात पाण्याअभावी पिके करपली

Water Scarcity : वीस ते पंचवीस दिवसांपासून डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी वाहत आहे. पाणी शिरूर तालुक्यातून सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत गेले. परंतु तालुक्यातील शेतकऱ्यांना अजून हे पाणी मिळाले नाही.
Crop burn
Crop burnAgrowon

Pune News : लाखणगाव (ता. आंबेगाव) परिसरातील पिके पाण्याअभावी करपू लागले आहे. वीस ते पंचवीस दिवसांपासून डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी वाहत आहे. पाणी शिरूर तालुक्यातून सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत गेले. परंतु तालुक्यातील शेतकऱ्यांना अजून हे पाणी मिळाले नाही.

पूर्वभागातील गावांना तातडीने पाणी सोडावे. येत्या २४ तासांच्या आत पाणी सोडले नाही तर शेतकऱ्यांना घेऊन पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन केले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिला आहे.

Crop burn
Summer Heat : अवकाळीमुळे ३.८ अंश सेल्सिअसने उतरला पारा

लाखणगाव परिसरातील शेतकऱ्यांची पिके करपून जाऊ लागली आहे. काहींची पिके जळाली आहे. वारंवार शेतकऱ्यांनी मागणी करून देखील पाटबंधारे विभागाकडून फक्त आश्वासने दिली गेली परंतु पाणी मात्र शेतकऱ्यांना मिळाले नाही. पिके पूर्णपणे जळून गेल्यामुळे येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Crop burn
Summer Heat : होरपळ बागांची अन् उत्पादकांचीही

या भागातील गणेश दौंड, युवराज टाकळकर, शिवम रोडे, राहुल पाचारणे, आनंदराव दौंड, प्रवीण पाचरणे, मारुती भागवत, किसन दौंड यासह अनेक शेतकऱ्यांची पिके करपून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

संबंधित शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडले. त्यानंतर प्रभाकर बांगर यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली व बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला.

एकीकडे राजकीय रणधुमाळी चालू असताना शेतकरी मात्र पाण्यासाठी टाहो फोडत आहे. राजकीय नेते मंडळींना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही शेतकऱ्यांनीच आता एकत्रित येऊन शेतकऱ्यांचा दबाव गट तयार करून या राजकारण्यांना धडा शिकवला पाहिजे व शेतकऱ्यांच्या एकजुटीची ताकद दाखवून दिली पाहिजे.
- प्रभाकर बांगर, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना पुणे जिल्हा
डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यातून नियमानुसार रोटेशनप्रमाणे सर्व गावांना पाणी दिले जात आहे. येत्या एक दोन दिवसांत लाखणगाव चारीला कालव्यातून पाणी सोडण्यात येणार आहे.
- डी. एस. कोकणे, उपकार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com