Pune Rain : पुरंदर, बारामती, इंदापूर, दौंड, शिरूरला पावसाचा जोर वाढला

Pune Rain Update : मंगळवारी (ता.२०) सकाळी आठ वाजेपर्यंत इंदापूर तालुक्यातील सणसरमध्ये ९५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे या भागातील भूजल पातळीत वाढ होऊ लागली आहे.
Rain Update
Rain Update Agrowon
Published on
Updated on

Pune News : पुणे जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. दुष्काळी समजल्या जाणाऱ्या पूर्व पट्ट्यातील पुरंदर, बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर तालुक्यांत पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. मंगळवारी (ता.२०) सकाळी आठ वाजेपर्यंत इंदापूर तालुक्यातील सणसरमध्ये ९५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे या भागातील भूजल पातळीत वाढ होऊ लागली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पूर्व भागात पावसाचा जोर कमी होता. मागील दोन ते तीन दिवसांपासून या भागात दुपारनंतर पाऊस होत आहे. त्यामुळे खरिपातील तूर, कापूस, बाजरी अशा पिकांना दिलासा मिळत असून पिकेही तरारली आहेत. सध्या पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साठले असून, काढणीच्या अवस्थेत असलेल्या मूग, सोयाबीन, उडीद पिकांचे काही प्रमाणात नुकसान होत आहे.

Rain Update
Monsoon Rain : नांदेडला मध्यम, लघू प्रकल्पांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा

शिरूरमधील रांजणगाव येथे ३९ मिलिमीटर पाऊस पडला. न्हावरा येथे ३० मिलिमीटर, तर वडगाव, मलठण, तळेगाव, कोरेगाव, पाबळ, शिरूर येथे हलका पाऊस पडला. बारामतीतील बारामती येथे २६ मिलिमीटर, तर उंडवडी २३, माळेगाव २२, पणदरे १९ मिलिमीटर पाऊस झाला असून वडगाव, लोणी, सुपा, मोरगाव येथे तुरळक सरी पडल्या.

इंदापुरातील भिगवण येथे २५ मिलिलिटर, तर इंदापूर ७५, लोणी १४, बावडा ६०, काटी २७, निमगाव ४०, अंथुर्णी येथे ३६ मिलिमीटर, दौंडमधील रावणगाव येथे ५२ मिलिमीटर, तर बोरी भदक ३८, पारगाव येथे ३० मिलिमीटर, तर दौंड, देऊळगाव, पाटस, यवत, कडेगाव, राहू, वरवंड, खामगाव, वडगाव बांदे, बोरी पार्धी येथे तुरळक सरी पडल्या.

Rain Update
Maharashtra Rain Update : चार दिवस अनेक ठिकाणी मुसळधारेचे संकेत; रविवारपर्यंत राज्यातील अनेक भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज

पुरंदरमधील कुंभारवळण येथे २५ मिलिमीटर, तर सासवड, भिवंडी, जेजुरी, परिंचे, राजेवाडी, वाल्हा येथे हलका पाऊस झाला. पुणे वेधशाळा, केशवनगर, खडकवासला, चिंचवड, कळस, अष्टापूर येथे हलका, मुळशीतील मुठे येथे २८ मिलिमीटर, तर पौड, घोटावडे, थेरगाव, माले, पिरंगुट येथे तुरळक, भोरमधील वेळू येथे ६२ मिलिमीटर, तर भोर ५१, नसरापूर, किकवी ३७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यातील बहुतांश धरणे भरली

राज्यात यंदा जोरदार पावसाने हजेरी लावली असून, पावसामुळे पुणे विभागातील बहुतांश धरणे आता भरत आली आहेत. भाटघर, वीर आणि उजनी धरण शंभर टक्के भरले आहेत. तर, पानशेत, मुळशी, टेमघर, पवना, शेटफळ, कळमोडी, गुंजवणी, येडगाव, वडज, घोड, डिंभे धरणे देखील ८० टक्क्यांवर भरली आहेत. सध्या या सर्व धरणांमधून विसर्ग सुरू असून मुळा, मुठा, भीमा, नीरा नदीपात्रात पाण्याची आवक होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com