Dam Water Storage : पावसाच्या उघडीपीने धरणातील पाणी आवक घटली

Dam Water Level : गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. अनेक ठिकाणी कडक ऊन पडत आहे. त्यामुळे धरणातील आवक घटली आहे.
Khadakwasla Dam
Khadakwasla DamAgrowon

Pune Dam News : गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. अनेक ठिकाणी कडक ऊन पडत आहे. त्यामुळे धरणातील आवक घटली आहे. सोमवारी (ता. १७) सकाळी आठ वाजेपर्यंत ०.५१ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. आतापर्यंत धरणात नव्याने एकूण १०.४८ टीएमसी एवढ्या पाण्याचा येवा दाखल झाला आहे.

सध्या जिल्ह्यातील २६ धरणांतील पाण्याची उपयुक्त क्षमता १९८.३४ टीएमसी आहे. गेल्या वर्षी जवळपास ही सर्व धरणे भरली होती. यंदा हवामान विभागाने १०६ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता.

त्यानुसार साधारणपणे सात जून रोजी मॉन्सून दाखल झाल्यानंतर दक्षिण महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमीअधिक होता.

Khadakwasla Dam
Dam Water Storage : भीमा खोऱ्यातील २६ धरणांमध्ये ५५ टीएमसीच पाणी

काही धरणक्षेत्रात पावसाचा जोर अधिक होता. यात मुठा खोरे, निरा, कुकडी आणि भीमा खोऱ्यातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर अधिक राहिला. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतातून पाणी वाहिल्याने ओढेही खळाळून वाहू लागले आहेत. धरणांत सुरुवातीला कमी आवक होती. परंतु पावसाचा जोर वाढल्यानंतर धरणांत नव्याने आवक सुरू झाली होती.

निरा आणि भीमा नदीच्या कार्यक्षेत्रात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. या कार्यक्षेत्रात १४४ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. उजनी धरणात सर्वाधिक पाण्याची आवक झाली आहे. आतापर्यंत उजनीत ६.२६ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. यामुळे उजनीतील पाणीसाठा उणे २५.८९ टीएमसी म्हणजेच उणे ४८ टक्के झाला आहे.

Khadakwasla Dam
Dam Water Storage : ‘कुरनूर’च्या पाणीपातळीत वाढ

एक ते १७ जून या कालावधीत टेमघर क्षेत्रात १०९ मिमी पाऊस पडला. तर वरसगाव ८५, पानशेत ८३, खडकवासला ९४, पवना ८४, कासारसाई ५६, कळमोडी ५७, चासकमान १०४, भामा आसखेड ३७, आंध्रा ३५, वडीवळे १८, नाझरे १५७, गुंजवणी ११४, भाटघर १३१, निरा देवघर ७४, वीर ११५, पिंपळगाव जोगे २४, माणिकडोह ५२, येडगाव ८०, वडज २२, डिंभे ५५, चिल्हेवाडी २१, घोड १६०, विसापूर क्षेत्रात १०३ मिमी पाऊस पडला. त्यामुळे मागील आठवड्यात धरणांत दररोज अर्धा ते पाऊण टीएमसी पाण्याची आवक झाली होती.

एक ते १७ जून या कालावधीत खोरेनिहाय झालेला पाणीसाठी (टीएमसीमध्ये)

खोरे --- आलेला पाणीसाठा

मुठा -- १.२४

निरा --- १.१४

कुकडी --- १.४८

उजनी -- ६.२६

एकूण --- १०.४८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com