Dam Water Storage : ‘कुरनूर’च्या पाणीपातळीत वाढ

Rain Update : अक्कलकोट तालुक्याची वरदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुरनूर धरणात पावसामुळे पाणी येण्यास सुरवात झाली असून, पाणी पातळीत वाढ होऊन ८ टक्के पाणीसाठा झाला आहे.
Dam Water Storage
Dam Water StorageAgrowon

Akkalkot News : अक्कलकोट तालुक्याची वरदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुरनूर धरणात पावसामुळे पाणी येण्यास सुरवात झाली असून, पाणी पातळीत वाढ होऊन ८ टक्के पाणीसाठा झाला आहे. कुरनूर धरण लाभक्षेत्रात गुरुवारी सायंकाळी पडलेल्या पावसामुळे धरणात पाणी येण्यास सुरवात झाली आहे. सध्या धरणात १९७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे.

धरणाच्या लाभक्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरण उपयुक्त पातळीत आले आहे. तसेच गुरुवारी सायंकाळी पडलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. यामुळे शेतकरी व परिसरातील नागरिकांमधून आनंद व्यक्त होत आहे.

Dam Water Storage
Koyna Dam water storage : कोयनेच्या पाणी साठ्यात घट, विजनिर्मीतीला अडथळे, भारनियमन वाढण्याची शक्यता

मागील वर्षी पडलेल्या अत्यल्प पावसामुळे कुरनूर धरणात केवळ ३० टक्केच पाणीसाठा झाला होता. या धरणावर अक्कलकोट तालुक्यातील तीन नगरपालिकांसह ५२ गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. मात्र, मागील वर्षी साठलेल्या अत्यल्प पाण्यामुळे विशेषतः शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढवले होते.

गावागावातील पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला होता. बोरी व हरणा या दोन नद्यांवर या धरणातील पाणीसाठा अवलंबून आहे. सद्यःस्थितीत हरणा नदी प्रवाहित झाल्याने मायनसमध्ये गेलेले धरण उपयुक्त पातळीत येऊन धरण प्लसमध्ये आलेले आहे.

Dam Water Storage
Dam Water Storage : भीमा खोऱ्यातील २६ धरणांमध्ये ५५ टीएमसीच पाणी

गुरुवारी चपळगाव, तीर्थ, हालहली अ., हन्नूर, कुरनूर, बावकरवाडी, डोंगरजवळगे व चपळगाव पंचक्रोशीत सुमारे एक तास दमदार पाऊस पडला. यामुळे पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत झाली. बोरी व हरणा नदीपात्रात मृग नक्षत्राच्या पावसामुळे पाणी येत आहे. बोरी नदीपात्रातून पाण्याचे प्रमाण कमी आहे तर हरणा नदीपात्रातून पाण्याचे प्रमाण जास्त आहे. १२ जूनपर्यंत धरणात दीड फूट (३.५%) पाणी होते. गुरुवारी पडलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

गुरुवारी सायंकाळी चपळगाव भागात दमदार पडलेल्या पावसामुळे धरणासह जमिनीच्या पाणी साठ्यात वाढ झालेली आहे. हा पाऊस ऊस, केळी, फळबागांसह खरीप हंगामासाठी अतिशय चांगला आहे. पावसानंतर वापसा मिळाल्यानंतर तूर, सोयाबीनची पेरणी होईल व त्यांच्याकडे उसाची रोपे असतील ते उसाची लागण करतील. यंदा चांगल्या पावसामुळे उसाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.
- अंबन्ना भंगे, शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com