Dam Water Storage : भीमा खोऱ्यातील २६ धरणांमध्ये ५५ टीएमसीच पाणी

Water Level Update : भीमा खोऱ्यातील नगर, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांमधील २६ धरणे आता तळ गाठत असल्याची स्थिती आहे.
Dam Update
Dam UpdateAgrowon
Published on
Updated on

Solapur News : भीमा खोऱ्यातील नगर, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांमधील २६ धरणे आता तळ गाठत असल्याची स्थिती आहे. एप्रिलच्या सुरवातीलाच पुणे, नगर, सोलापूर, धाराशिव या शहर-जिल्ह्यांसाठी उजनी धरण महत्त्वाचे आहे, पण तेही आता उणे ३७ टक्के झाले आहे. तर भीमा खोऱ्यातील तब्बल २१ धरणे आताच निम्मी रिकामी झाली आहेत. खोऱ्यातील २६ धरणांमध्ये केवळ ५५ टीएमसी पाणीसाठा आहे.

राज्यात गतवर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने जमिनीची पाणीपातळी देखील जवळपास एक मीटरने खोल गेल्याने अनेक गावांचे सार्वजनिक जलस्रोत बंद पडल्याची वस्तुस्थिती आहे. अनेक जलस्रोत आटत आले असल्याने गावांचा व शहरांचा पाणीपुरवठा आता विस्कळित झाला आहे. सोलापूर शहराच्या निम्म्या भागाला पाच दिवसाआड तर काही भागाला चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.

Dam Update
Water Crisis : ‘पाणीबाणी’वर शाश्‍वत उपाय

पुणे जिल्ह्यातील स्थिती देखील अशीच होवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या दुष्काळात केवळ पाणीपुरवठ्याच्या टॅंकरवर १०० ते १५० कोटी खर्च करण्याची तरतूद शासनाने यापूर्वीच केली आहे. अनेक धरणांची पातळी खालावल्याने शेतीला पाणी सोडता येत नाही, अशी स्थिती आहे. दुसरीकडे पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देताना नदी व धरण क्षेत्रातील वीजपुरवठा दोन ते पाच तासच करण्यात आला आहे. ऐन निवडणुकीच्या काळातील दुष्काळाची तीव्रता नेमकी कोणत्या राजकीय पक्षाला झळ पोचवणार, यासंदर्भात तर्कवितर्क लढविले जात आहेत.w

Dam Update
Water Scarcity : बोअरवेल आटल्या, विहिरी कोरड्या

भीमा खोऱ्यातील धरणांची सद्य:स्थिती

उजनी (उणे ३७ टक्के), पिंपळगाव जोगे (०.९७ टीएमसी), माणिकडोह (०.५१ टीएमसी), येडगाव (०.८० टीएमसी), वडज (०.४० टीएमसी), डिंभे (४.४८ टीएमसी), घोड (१.२१ टीएमसी), विसापूर (०.१३ टीएमसी), चिल्हेवाडी (०.१७ टीएमसी), कळमोडी (१.४० टीएमसी), चासकमान (२.२९ टीएमसी), भामा आसखेड (२.९२ टीएमसी), वडिवळे (०.६४ टीएमसी), आंद्रा (१.५५ टीएमसी), पवना (३.७१ टीएमसी), कासारसाई (०.३० टीएमसी), मुळशी (८.३७ टीएमसी), टेमघर (०.३१ टीएमसी), वरसगाव (६ टीएमसी), पानशेत (४.३७ टीएमसी), खडकवासला (१.१० टीएमसी), गुंजवणी (१.४८ टीएमसी), नीरा देवघर (३.७२ टीएमसी), भाटघर (६ टीएमसी), वीर (४.४३ टीएमसी), नाझरे (०० टीएमसी).

मागील दोन वर्षांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जमिनीची पाणीपातळी खोलवर गेली आहे. सोलापूर जिल्ह्यात या वर्षी मागील ५ वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक पाऊण मीटरपेक्षाही जास्त पाणीपातळी खोलवर गेल्याचे भूजल सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
डॉ. मुश्ताक शेख, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com