Agriculture Festival : इंदापूर कृषी महोत्सवाचे आज होणार उद्‌घाटन

Agriculture Exhibition : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित इंदापूर कृषी महोत्सव २०२४ चे उद्घाटन आज, बुधवारी (ता.२४) होणार असून हे कृषी प्रदर्शन २८ जानेवारीपर्यंत चालणार आहे.
Indapur APMC
Indapur APMCAgrowon

Pune News : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित इंदापूर कृषी महोत्सव २०२४ चे उद्घाटन आज, बुधवारी (ता.२४) होणार असून हे कृषी प्रदर्शन २८ जानेवारीपर्यंत चालणार आहे. दरम्यान, या पाच दिवसीय प्रदर्शनाच्या तयारीचा आढावा बाजार समितीचे माजी सभापती व मार्गदर्शक अप्पासाहेब जगदाळे व सभापती विलासराव माने यांनी घेतला.

या प्रदर्शनात कृषी, पशुपक्षी, जनावरे, मत्स्य प्रदर्शन व डॉग शो तसेच पुणे जिल्ह्यातील एकमेव घोडे बाजाराचे आयोजन केलेले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना जगदाळे म्हणाले, ‘‘बाजार समितीचे ‘इंदापूर कृषी महोत्सव-२०२४’ अंतर्गत कृषी प्रदर्शनात शेती उत्पादने, बी-बियाणे, शेती औजारे-साधने, ऑटो मोबाइल्स, गृहोपयोगी आवश्यक वस्तू तसेच शेती/कृषी आनुषंगिक यांत्रिक साहित्य याबाबतचे कृषी प्रदर्शन २५० स्टॉल, ५० खाद्य स्टॉल, पशुपक्षी, जनावरे प्रदर्शन आणि अश्‍व बाजार तसेच डॉग शो प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे. शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम व पुरुष-मुलांसाठी ‘महाराष्ट्राची लोककला’ हा कार्यक्रम देखील असणार आहे.

या कृषी प्रदर्शन व घोडे चाल स्पर्धा उद्घाटन बुधवारी (ता.२४ जानेवारी) दुपारी ३ वाजता मोहोळ विधानसभेचे आमदार यशवंत माने यांच्या हस्ते व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.

Indapur APMC
Krushik Agriculture Exhibition 2024 : कृत्रिम बुद्धिमत्ता नव्हे, शेतीत मदतीला तत्पर तज्ज्ञ!

कृषी प्रदर्शन समारोप, बक्षीस वितरण समारंभ रविवारी (ता.२८) सकाळी ११ वाजता खासदार सुप्रिया सुळे यांचे हस्ते, माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार राजन पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

Indapur APMC
Baramati Agriculture Exhibition : एक झाड फळ मात्र दोन! एआयची करामत

शेतकरी, आडत्यांचा होणार गौरव

शेतकरी बांधव दुष्काळी परिस्थिती व नैसर्गिक आपत्ती यावर मात करून ऊसशेती, फळबाग, भाजीपाला, भुसार वगैरे उत्पादने घेत असून त्यांच्या शेतीविषयक लागवड व उत्पादनास आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळून त्यांचे शेती व शेतीपूरक व्यवसाय उत्पादनात वाढ व्हावी या उद्देशाने बाजार समितीने कृषी प्रदर्शनाचे आयोजन केलेले आहे.

प्रदर्शनामध्ये शेतमाल उत्पादनातील अग्रेसर प्रगतिशील शेतकरी व नियमित शेतमाल खरेदी-विक्रीचे उत्कृष्ट व उच्चांकी कामकाज करणाऱ्या व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा यथोचित सत्कार केला जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com