Agrowon Agriculture Exhibition 2024 : चार दिवसांत कोट्यवधींची उलाढाल

Agri Expo 2024 : छत्रपती संभाजीनगर येथे ११ ते १४ जानेवारी या कालावधीत पार पडलेल्या ॲग्रोवन कृषी या चार दिवसांच्या प्रदर्शन काळात कोट्यवधींची उलाढाल झाली.
Agriculture Exhibition
Agriculture ExhibitionAgrowon

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर येथे ११ ते १४ जानेवारी या कालावधीत पार पडलेल्या ॲग्रोवन कृषी प्रदर्शनात विविध प्रकारच्या कृषी निविष्ठा, अवजारे, सौरऊर्जाचलित उपकरणे, मालवाहू वाहने आदींसह ई-बाइक ते थेट ट्रॅक्टरपर्यंतची विक्री झाली. प्रदर्शनात सहभागी विविध कंपन्यांची अवजारे, वाहने, उपकरणे आदींच्या नोंदणीलाही उत्तम प्रतिसाद मिळाला. चार दिवसांच्या या प्रदर्शन काळात कोट्यवधींची उलाढाल झाली.

जालना रस्त्यावरील केंब्रिज चौकातील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या मैदानावर हे प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्यास मराठवाड्यासह खानदेश, नगर आदी भागांमधील कानाकोपऱ्यातील शेतकरी, खरेदीदारांनी हजेरी लावली. जीके एनर्जी यांच्या सौरऊर्जेवरील पंपांच्या खरेदीसंबंधी अनेक ग्राहकांनी रस दाखविला.

Agriculture Exhibition
Agriculture Exhibition 2024 : सेंद्रिय कापूस पिकवला; प्रक्रियेतून दिली बाजारपेठ

या स्टॉलवर चांगली उलाढाल झाली, इकोजेन या कंपनीचा सौर पंप, शीतगृह खरेदीलाही ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला. सुमारे २५ पंपांच्या खरेदीसंबंधी नोंदणी झाली. तसेच मे. बी. जी. चितळे डेअरी (भिलवडी, सांगली), इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स को-ऑपरेटिव्ह लि. (इफ्को) यांच्या स्टॉलवरही चांगली उलाढाल झाली. चितळे डेअरीच्या विविध दुग्धजन्य उत्पादनांना ग्राहकांनी पसंती दाखवली.

यंत्रांची खरेदी

पितांबरी नर्सरी या रोपांच्या स्टॉलवरही रोपांची विक्री झाली. कायनेटिक ग्रीन यांच्या ई-बाइकच्या खरेदीसाठी ४५० जणांनी नोंदणी केली. सुमारे ५० लाख रुपयांच्या ई-बाइकचे बुकिंग झाले. ॲरोनिक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीस व रुचा यंत्र एलएलपी यांच्या शेती उपयोगाच्या ड्रोनच्या खरेदीसाठीही अनेकांकडून विचारणा झाली. ध्रुव ट्रॅक्टर्स ॲण्ड ॲग्रो इंडस्ट्रीज यांच्या शेती अवजारांच्या खरेदीसाठी ५०० जणांकडून पसंती आली.

Agriculture Exhibition
Agrowon Exhibition 2024 : यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन, पण इंधन दरवाढीचे काय?

शिवतारा ॲग्रो सर्व्हिसेस यांच्या शेती उपयोगी अवजारे विक्रीच्या स्टॉलवरही शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली. नांगर, मळणी यंत्र, रोटाव्हेटर यांचीही चांगली विक्री झाली. बळीराजा ॲग्रो इंडस्ट्रीज यांच्या शेती अवजारे विक्रीच्या स्टॉललाही प्रदर्शनात चांगला प्रतिसाद मिळाला.

कुबोटा ट्रॅक्टरच्या स्टॉलवर शेतकऱ्यांनी माहिती घेण्यासाठी गर्दी केली. एका ट्रॅक्टरची विक्रीदेखील झाली. ओम साई ॲग्रो इंजिनिअरिंग यांच्या शेती अवजारांच्या दालनालाही ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांनी भेट देऊन माहिती घेतली.

वितरणासाठीही नोंदणी

शुभा टेक्नॉलॉजीस सर्व्हिस यांच्या स्टॉलवरील पाणी फिल्टर यंत्र, डिझेल इंजिन आदी पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होती. अकुदास दूधकांडी पशुखाद्याच्या स्टॉलवर वितरण व्यवस्थेसाठी (डीलरशिप) १३० हून अधिक जणांनी नोंदणी झाली.

या ठिकाणी सुमारे ५०० किलोहून अधिक पशुखाद्याची विक्रीही झाली. देवीक्रॉप सायन्स कंपनीकडे ५० जणांनी डीलरशिपसाठी नोंदणी घेतली. बावस्कर टेक्नॉलॅाजी यांच्या स्टॉलवर ५० हजारांहून अधिक रकमेची पुस्तक खरेदी झाली, याशिवाय ३०० हून अधिक शेतकऱ्यांनी वार्षिक वर्गणी जमा केली.

आठ लाखांच्या ट्रॅक्टरची खरेदी

जयपूर (ता. छत्रपती संभाजीनगर) येथील दत्तू भीमराव मते यांनी कृषी प्रदर्शनात सुमारे ८ लाख २० हजार रुपये किमतीच्या ट्रॅक्टरची खरेदी केली. प्रदर्शनात केलेल्या खरेदीमुळे त्यांना एक लाख रुपयांची सवलत देण्यात आली. ॲग्रोवनचे उपसरव्यवस्थापक बाळासाहेब खवले यांच्या हस्ते शेतकरी मते यांच्याकडे ट्रॅक्टरची चावी सोपविण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com