PM Modi On Dhan : सत्ता दिल्यास धानाचा एमएसपी ७८० रूपयांनी वाढवू; पंतप्रधान मोदी यांचे झारखंडवासियांना आश्वासन

Jharkhand Assembly Elections 2024 : पंजाबमध्ये सध्या धान खरेदी आणि धानाच्या एमएसपीवरून जोरदार आंदोलने केली जात आहेत. याचदरम्यान झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीरनामा जाहीर केला आहे.
PM Modi
PM ModiAgrowon
Published on
Updated on

Pune News : महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये यंदा विधानसभा निवडणूक होत आहे. दोन्ही राज्यात भाजप आणि काँग्रेस एकमेकांच्या समोर आहेत. यावेळी झारखंडमध्ये पुन्हा सत्ता आल्यास धानाचा एमएसपी ७८० रुपयांनी वाढणार, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रांची येथे दिले.

सध्या महाराष्ट्रासह झारखंड येथे विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत. दोन्ही राज्यात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. झारखंड विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होईल. पण महाराष्ट्रासह झारखंडचा निकाल एकाच वेळी लागणार आहे. दरम्यान भाजपने झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला.

PM Modi
PM Jan Dhan Yojana : पंतप्रधान जनधन योजनेची दहा वर्षे

या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना धानाच्या एमएसपीमध्ये वाढ करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यावेळी मोदी यांनी, झारखंड भाजपने एक उत्कृष्ट जाहिरनामा सादर केला असून यात अनेक लाभदायक योजना आहेत. यात गोगो दीदी योजनेसारख्या उपक्रम आहेत. महिलांना दरमहा २ हजार १०० रुपये आणि 'युवा साथी भत्ता' योजनेंतर्गत युवकांना २ हजार रुपये बेरोजगारी भत्ता दिला जाईल, अशी माहिती दिली.

PM Modi
PM Narendra Modi : कृत्रिम बुद्धिमत्तेचा नैतिक वापर व्हावा : पंतप्रधान मोदी

याचबरोबर भाजपने आपल्या जाहीरनाम्यात एलपीजी सिलिंडर ५०० रुपयांना दिला जाणार असून सणासुदीला दोन मोफत सिलिंडर दिले जातील, असे आश्वासन दिले आहे. तसेच तीन लाख सरकारी पदे भरली जातील आणि आघाडीच्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप दिली जाईल. इंटर्नशिप काळात पीएम पॅकेज अंतर्गत स्थानिक तरुणांना दरमहा ५ हजार रुपये दिले जातील. तर एससी, एसटी आणि ओबीसी समुदायांसाठी पीएम आवास योजनेअंतर्गत १६ लाख घरे बांधण्यात आली असून आणखी २१ लाख घरे बांधण्याचे आश्वासन पंतप्रधान यांनी दिले आहे.

पशुपालकांना आर्थिक मदत

अल्पभूधारक शेतकरी आणि पशुपालकांना आर्थिक मदत देण्यासाठी कृषी आशीर्वाद योजना सुरू करण्यात येणार आहे. ज्या अंतर्गत शेतकरी आणि पशुपालकांना प्रति ५ एकरांसाठी २५ हजार रूपयांची आर्थिक मदत दिली जाईल असेही आश्वासन देणअयात आले आहेत. भाजपने यापूर्वी झारखंडमध्ये कृषी आशीर्वाद योजना लागू केली होती. आता सरकार आल्यास ही योजना सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Agrowon
agrowon.esakal.com