Rain Update : मुळशी धरणक्षेत्रात सर्वाधिक २१० मिलिमीटर पाऊस

Mulshi Dam : गेल्या आठ-दहा दिवसांपासून मुळशी, टेमघर, पवना या धरणक्षेत्रांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. मंगळवारी (ता.२३) सकाळी आठ वाजेपर्यंत मुळशी धरणक्षेत्रात सर्वाधिक २१० मिलिमीटर पाऊस झाला आहे.
Rain Update
Rain Update Agrowon
Published on
Updated on

Pune News : गेल्या आठ-दहा दिवसांपासून मुळशी, टेमघर, पवना या धरणक्षेत्रांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. मंगळवारी (ता.२३) सकाळी आठ वाजेपर्यंत मुळशी धरणक्षेत्रात सर्वाधिक २१० मिलिमीटर पाऊस झाला आहे. या भागातील ओढे, नाले भरून वाहत असल्याने टेमघर, वरसगाव, पवना, गुंजवणी, मुळशी अशा प्रमुख धरणांतील पाणीपातळीत वेगाने वाढ होत आहे. मागील चोवीस तासांमध्ये एकूण धरणांमध्ये नव्याने ७.४६ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे पाणीसाठा हा ५० टक्क्यांच्या वर गेला आहे.

पावसाचे जवळपास पावणेदोन महिने झाले आहेत. या कालावधीत कमी-अधिक पाऊस पडला. पूर्व भागात सुरुवातीच्या काळात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे उजनी धरणांत आत्तापर्यंत जवळपास २१.०१ टीएमसी एवढा पाणीसाठा दाखल झाला आहे. परंतु वापर अधिक असल्याने उपलब्ध असलेल्या पाण्याची पातळी अजूनही उणेमध्ये आहेत.

तर पश्चिमेकडील घाटमाथ्यावर मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. सध्या वळवण घाटमाथ्यांवर १२९ मिलिमीटर, तर कुंडली १२८, ठोकरवाडी १२८, लोणावळा १२१, शिरोटा ७२ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे या भागातील धबधबे ओसंडून वाहत आहेत.

Rain Update
Kolhapur Rain : कोल्हापुरात ‘पंचगंगे’ने इशारा पातळी ओलांडली

मुठा खोऱ्यातील टेमघर धरणक्षेत्रात सर्वाधिक १०५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यामुळे या धरणात चोवीस तासांमध्ये ०.१६ टीएमसी एवढ्या पाण्याचा येवा दाखल झाला आहे.

या धरणांत एक जूनपासून ते आत्तापर्यंत एकूण १.५६ टीएमसी एवढा उपयुक्त पाणी दाखल झाले आहे. तर वरसगाव धरणक्षेत्रात ६६ मिलिमीटर, पानशेत ६६ मिलिमीटर पाऊस पडला. तर खडकवासला धरणक्षेत्रात तुरळक सरी बरसल्या. मुठा खोऱ्यातील धरणांत एक जूनपासून ते आत्तापर्यंत १६.२४ टीएमसी एवढे पाणी आले आहे.

Rain Update
Kolhapur Rain Flood : राधानगरी ८५ तर काळम्मावाडी ६४ टक्क्यांवर, पंचगंगेच्या पाणी पातळीत संथ गतीने वाढ

नीरा खोऱ्यातील धरणक्षेत्रात कमी-अधिक पाऊस आहे. पवना धरणक्षेत्रात १०६ मिलिमीटर, वडिवळे ९६, तर नीरा देवघर ८९, गुंजवणी ६५, भाटघर ३१, कळमोडी ५८, भामा आसखेड, कासारसाई ४१, गुंजवणी मिलिमीटर पाऊस झाला. तर नाझरे, वीर या धरणक्षेत्रांत पावसाच्या तुरळक झाल्या.

त्यामुळे या धरणक्षेत्रातील धरणांत नव्याने २.६५ टीएमसी एवढा पाणीसाठा दाखल झाला आहे. कुकडी खोऱ्यांतील पिंपळगाव जोगे, माणिकडोह, वडज, डिंभे, चिल्हेवाडी या धरणक्षेत्रांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या. तर येडगाव, घोड, विसापूर, उजनी धरणक्षेत्रांत ढगाळ वातावरणाची स्थिती कायम आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com