Pradhan Mantri Crop Insurance Scheme : पंतप्रधान पीक विमा योजनेच्या लाभार्थ्यांचा आलेख वाढल्याचा कृषी मंत्रालयाचा दावा

PM Crop Insurance Scheme : देशात गेल्या ८ वर्षात पंतप्रधान पीक विमा योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढली आहे. तर या योजनेअंतर्गत आतापर्यंत १.५५ लाख कोटी रुपयांचा थेट लाभ २३ कोटी शेतकऱ्यांना मिळालेला आहे.
Pradhan Mantri Crop Insurance Scheme
Pradhan Mantri Crop Insurance SchemeAgrowon
Published on
Updated on

Pune News : केंद्र सरकारकडून २०१६ मध्ये पीएम पीक विमा योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेला आता ८ वर्ष होत असून यातून तब्बल २३ कोटी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत ८ वर्षात २३ कोटी शेतकऱ्यांना १.५५ लाख कोटी रुपयांचा थेट लाभ मिळाला आहे.

पंतप्रधान पीक विमा योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या झपाट्याने ही वाढत आहे. या योजनेअंतर्गत, ८ वर्षांमध्ये २३ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात १.५५ लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. तर ही रक्कम शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या स्वरूपात पीक विमा घेतल्यानंतर मिळालेली आहे.

Pradhan Mantri Crop Insurance Scheme
Crop Insurance Scheme : पीकविमा योजनेत सुधारणांची मोठी गरज

याबाबत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने माहिती दिली आहे. मंत्रालयाच्या मते, ८ वर्षात तब्बल ५६.८० कोटी शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत अर्ज केले होते. यापैकी २३.२२ कोटीहून अधिक शेतकऱ्यांचे दावे प्राप्त झाले. तर पीक विमा योजनेतंर्गत शेतकऱ्यांनी प्रीमियमचा हिस्सा म्हणून अंदाजे ३१,१३९ कोटी रूपये भरले होते. यानंतर शेतकऱ्यांना १.५५.९७७ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.

Pradhan Mantri Crop Insurance Scheme
Crop Insurance Scheme : ...आता पीक विमाची माहिती मिळणार घरबसल्या; एका कॉलवर मिळणार सगळी अपडेट

पीएम पीक विमा योजनेची सुरूवात

देशातील सगळ्यात मोठी असणारी पीक विमा योजना ही जगातील देखील सगळ्यात मोठी योजना आहे. ही योजना २०१६ मध्ये केंद्र सरकारने सुरू केली. या योजनेंतर्गत, शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान किंवा अनपेक्षित घटनांमुळे होणारे नुकसानीपासून संरक्षण दिले जाते. विशेषतः नैसर्गिक आपत्तीने होणाऱ्या नुकसानीसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.

लाभार्थ्यांची संख्या

पीएम पीक विमा योजनेतील व्याप्ती ही दरवर्षी वाढत आहे. या योजनेतंर्गत शेतकरी पीक विमा योजनेसाठी नोंदणी करत असून अर्ज दाखल करत आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, २०२३-२४ मध्ये पीक विमा योजनेसाठी अर्ज करणाऱ्यांच्या संख्येत २७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com