Crop Insurance Scheme : ...आता पीक विमाची माहिती मिळणार घरबसल्या; एका कॉलवर मिळणार सगळी अपडेट

Pradhan Mantri Crop Insurance Scheme : शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ आणि त्याची रक्कम असो किंवा अर्जाची स्थिती याची माहिती मिळण्यात अडचणी येत आहेत.
Crop Insurance Scheme
Crop Insurance SchemeAgrowon
Published on
Updated on

Pune News : शेतकऱ्यांना शेती करताना अनेक समस्यांसह नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागते. त्यामध्ये अवकाळी पाऊस, वादळामुळे शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त होतात. शेतीचे प्रचंड नुकसान होते. अशावेळी त्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून पंतप्रधान पीक विमा योजना (PMFBY) केंद्र सरकारकडून राबवली जाते. त्यामध्ये राज्य सरकारकडूनही पिकांचा विमा काढण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. त्यानंतर अनेक शेतकरी हे पिकांचा विमा काढतात. मात्र शेतकऱ्यांना लवकर मोबदला मिळत नाही. विमा कंपन्यांकडून त्यांना खेटे मारायला भाग पाडले जाते. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे पिचलेला शेतकरी हवालदिल होतो.

विमा कंपन्यांच्या अशा मार्गाला आळा घालण्यासह शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून एक टोल फ्री क्रमांक जारी केला जाणार आहे. जो फक्त पीक विमा दाव्याच्या समस्या सोडवण्यासाठी असेल. हा टोल फ्री नंबर शेतकऱ्यांच्या सेवेत लवकरच येणार आहे.

Crop Insurance Scheme
Crop Insurance Scheme Kolhapur : प्रधानमंत्र्यांची पीक विमा योजना म्हणजे 'नुकसान परवडलं; पण नियम नकोत'

टोल फ्री क्रमांक कधी होणार सुरू?

नैसर्गिक आपत्तींमुळे अनेक शेतकऱ्यांनी नुकसानाला सामाोरे जावं लागलं आहे. तर कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत सुमारे ३७ कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ मिळाला आहे. पण पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत दाखल केलेल्या अर्जांची सध्यस्थितीची माहिती शेतकऱ्यांना कळत नाही. त्यामुळे त्यांना विमा कंपन्यांचे खेटे मारावे लागतात. त्यावर आता सरकारकडून टोल फ्री नंबर जारी करण्यात येणार असून तो पुढील आठवड्यात जारी करण्यात येणार आहे.

टोल फ्री नंबर कोणता?

शेतकऱ्यांच्या पीक विम्याशी निगडीत समस्या सोडविण्यासाठी सरकारकडून टोल फ्री नंबर जारी करण्यात येणार असून त्याचा क्रमांक १४४४७ असा असेल. या टोल फ्री क्रमांकावरून देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून शेतकऱ्यांला त्याच्या अर्जाची स्थिती कळू शकणार आहे.

Crop Insurance Scheme
Dhananjay Munde : रब्बी हंगामातही १ रुपयात पीक विमा योजना राबवणार ; कृषीमंत्री धनंजय मुंडे

दरम्यान टोल फ्री क्रमांकांचा पायलट प्रोजेक्ट हा छत्तीसगडमध्ये यशस्वी झाला असून त्यानंतर आता हा टोल फ्री क्रमांक संपूर्ण देशासाठी देण्यात आला आहे. तर टोल फ्री क्रमांक पूर्णपणे तयार असून पुढील आठवड्यात तो सुरू होण्याची शक्यता आहे.

काय असेल प्रक्रिया?

शेतकऱ्यांना यासाठी आधी या १४४४७ फोन करावा लागेल. त्यानंतर विम्याशी संबंधित माहिती द्यावी लागेल. यानंतर त्यांना एक एसएमएस येईल. यानंतर शेतकऱ्याला दिलेल्या आयडीच्या मदतीने अर्जाची स्थिती कळू शकेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com