Farmer Activities : शेतकरी हिताच्या उपक्रमांना सरकार पाठबळ देणार

CM Eknath Shinde : शासनाकडून उपक्रमांना बळ देण्याचे काम यापुढील काळात देखील होईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्‍त केला.
Eknath Shinde
Eknath ShindeAgrowon
Published on
Updated on

Vardha News : प्रशासनाच्या पुढाकारातून जिल्ह्यात स्ट्रॉबेरीसारख्या व्यावसायिक पिकाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न होत आहे. शासनाच्या या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देत स्ट्रॉबेरी लागवड आणि विक्रीसाठी पाटील दांपत्याने पुढाकार घेतला.

यातून त्यांना चांगला परतावा देखील मिळत असल्याने शासनाकडून अशा उपक्रमांना बळ देण्याचे काम यापुढील काळात देखील होईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्‍त केला.

Eknath Shinde
Chana Crop : रब्बीत हरभरा पीकच अग्रस्थानी

वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये आर्थिक समृद्धी यावी याकरिता जिल्हाधिकारी राहुल कर्डिले प्रयत्नशील आहेत. त्याच प्रयत्नाचा भाग म्हणून पारंपारीकसोबतच व्यावसायिक पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यावर त्यांनी भर दिला आहे.

रेशीम, स्ट्रॉबेरी अशा पिकांसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. हिंगणघाट तालुक्‍यातील कात्री येथील युवा शेतकरी भारती व महेश पाटील या एक एकरावर तर शंकर पाटील यांनी चार एकरावर स्ट्रॉबेरी लागवड केली आहे. भारती पाटील यांच्या शेतातील स्ट्रॉबेरीची काढणी देखील झाली.

Eknath Shinde
Tur Production : एकात्मिक व्यवस्थापनातून तूर उत्पादनात वाढ करावी

त्याविषयीची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी भारती व महेश पाटील या दांपत्याला हिवाळी अधिवेशनात बोलावून घेत त्यांच्याशी चर्चा करीत त्यांच्या प्रयोगशीलतेचे कौतुक केले. यावेळी विधान परिषदेच्या सभापती डॉ. निलम गोऱ्हे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले उपस्थित होते.

जिल्ह्यात कृषी विकासावर भर देत पथदर्शी प्रकल्प राबविण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळेच स्ट्रॉबेरी लागवड ११ एकरांवर पोहोचली आहे, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बोलताना सांगितले.

जिल्ह्यात नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत कृषी विकासावर भर देत पथदर्शी प्रकल्प राबविण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळेच स्ट्रॉबेरी लागवड ११ एकरावर पोहोचली आहे. रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी देखील प्रयत्न होत असून शेतकऱ्यांची आर्थिक समृद्धी हे एकच मिशन आहे.
राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी, वर्धा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com