Chana Crop : रब्बीत हरभरा पीकच अग्रस्थानी

Rabi Season : मॉन्सूनोत्तर पाऊस झाल्याने लागवडीला गती आले. यामुळे हरभऱ्याचे राज्यातील लागवड क्षेत्र २० लाख ३० हजार ७१८ हेक्टरपर्यंत पोहोचले आहे.
Chana Crop
Chana CropAgrowon
Published on
Updated on

Akola News : विविध अडचणींना सामोरे जात असलेला यंदा रब्बी हंगाम सुरुवातीला जमिनीत ओल कमी असल्याने रखडला होता. मात्र, मॉन्सूनोत्तर पाऊस झाल्याने लागवडीला गती आले. यामुळे हरभऱ्याचे राज्यातील लागवड क्षेत्र २० लाख ३० हजार ७१८ हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. तर पश्‍चिम विदर्भातील बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत सरासरी क्षेत्र ओलांडले असून अकोल्यात मात्र हरभरा लागवड संथ गतीने झाली. सरासरी क्षेत्रापर्यंतही पोहोचू शकलेली नाही.

राज्यात हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र २१ लाख ५२ हजार १४ हेक्टर असून आतापर्यंत २० लाख ३० हजार ७१८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर रब्बी ज्वारीने दुसरे स्‍थान गाठले आहे. रब्बीत ज्वारीची १२ लाख ६५ हजार ३३५ हेक्टरवर लागवड पोचली. गव्हाचे क्षेत्र सहा लाख ९ हजार ८०४ हेक्टर असून तिसऱ्या स्थानावर आहे.

Chana Crop
Chana Pest Crop Damage : घाटेअळीला कंटाळून हरभरापिकावर फिरवला रोटर

वऱ्हाडात हरभरा लागवड

बुलडाणा जिल्ह्यात सरासरी १ लाख ४६ हजार ४३८ हेक्टरच्या तुलनेत २ लाख ११ हजार ७०७ हेक्टरवर आतापर्यंत हरभरा लागवड झाली. सरासरीच्या १४५ टक्के ही लागवड पोहोचली आहे. तर अकोला जिल्ह्यात १० लाख ३१० हेक्टरच्या तुलनेत ६५ हजार १९८ हेक्टर म्हणजेच अवघी ६५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली.

वाशीम जिल्ह्यात हरभरा लागवडीने सरासरी ६०८४४ हेक्टरच्या तुलनेत ६५७०६ हेक्टरवर पेरणी आटोपली. गव्हाची लागवड या जिल्ह्यात १०१ टक्के क्षेत्रावर आटोपली. वाशीम जिल्ह्यात यंदा २५ हजार ८२९ हेक्टरच्या तुलनेत २६१०७ हेक्टरवर लागवड झाली. बुलडाणा जिल्हयात गव्हाची लागवड ४० हजार २२९ हेक्टर झाली आहे. अकोल्यात १५ हजार १४ हेक्टरवर आतापर्यंत पेरणी झालेली आहे. पश्‍चिम विदर्भात बुलडाणा जिल्‍ह्यात मक्याची रब्बीत चांगली लागवड होते. यंदा ही लागवड ११ हजार ७८१ हेक्टरच्या तुलनेत ८२८१ हेक्टर एवढी झाली आहे.

Chana Crop
Chana Pest Management : हरभरा पिकातील घाटे अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

रब्बीत अडचणी सुरुवातीपासूनच

यंदाच्या रब्बी हंगामात पिकांच्या लागवडीपासून अडचणींना सुरुवात झाली. मॉन्सूनोत्तर पावसामुळे लागवडीच्या तोंडावर हरभरा, गहू पिकाला फटका बसला. ओलाव्यामुळे बुरशीजन्य रोग वाढून हरभरा पिकात मर रोगाचा अधिक प्रमाणात प्रादुर्भाव होऊन पिकाचे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांनी हरभऱ्याचे पीक मोडून काढले.

रब्बीत राज्यात प्रमुख पिकांची लागवड

पीक लागवड सरासरी

हरभरा २०३०७१८ हेक्टर २१५२०१४

ज्वारी १२६५३३५ हेक्टर १७५३११८

गहू ६०९८०४ हेक्टर १०४८८०७

मका २००६५० हेक्टर २५८३२१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com