Farmer Loan Waive : सरसकट कर्जमुक्ती, साप वन्यजीव घोषित करा

Agriculture Loan : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती देण्यात यावी, कायद्यात सापाचा वन्यजीव म्हणून उल्लेख करण्यात यावा, अशा आशयाचा ठराव वागद इजारा ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
Loan Waive Resolution
Loan Waive ResolutionAgrowon
Published on
Updated on

Yavatmal News : : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती देण्यात यावी, कायद्यात सापाचा वन्यजीव म्हणून उल्लेख करण्यात यावा, अशा आशयाचा ठराव वागद इजारा ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

राज्यात ग्रामपंचायतीने अशा प्रकारचा पहिलाच ठराव पारित झाला असून त्याची प्रत राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, कृषिमंत्री, महाराष्ट्राचे वनमंत्री यांना पाठविण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रवक्ते व वागदचे रहिवासी मनीष जाधव यांनी हा ठराव मांडला. त्याला दावला काळे यांनी अनुमोदन दिले. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच मालू चव्हाण होत्या.

Loan Waive Resolution
Farmer Loan Waive : शेतकरी संघटनांची सरसकट वीज बिल व कर्जमाफीची मागणी

ग्रामसेवक विजय कांबळे, सदस्य रखमा जाधव, कल्याणी जाधव, नीता खोकले, किरण कांबळे तसेच गावकरी संजय जाधव, तुकाराम राठोड, देविदास राठोड, रोजगार हमी सेवक भिकन राठोड, भारत चव्हाण, मारुती खंदारे, विजय जाधव, वैभव वायकोळे, संतोष मुळे, गणेश खोकले व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सन १९७२ च्या वनसंरक्षण कायद्यानुसार साप हा वन्यजीव घोषित करून सर्पदंशाने शेतकऱ्याचा व शेतमजुराचा मृत्यू झाल्यास त्याला आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. साप वन्यजीव नाही, त्यामुळे सर्पदंश झालेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास आर्थिक मदत देता येणार नाही, हे वनमंत्र्यांचे वक्तव्य शेतकरी व शेतमजुरावर अन्याय करणारे असल्याचे मत मनीष जाधव यांनी ग्रामसभेत मांडले.

Loan Waive Resolution
Farmer Loan Waive : कर्जमुक्‍तीशिवाय आता माघार नाही

मदतीपासून शेतकरी वंचित

महागाव तालुक्यातील पोखरी येथील सतीश राठोड या युवा शेतकऱ्याचा मृत्यू शेतात निंदण करीत असताना सर्पदंशाने झाला. या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या कुटुंबातील लोकांनी वनविभाग व संबंधित कृषी, महसूल कार्यालयाचे उंबरठे झिजविले.

पण एक रुपयाचीही मदत त्यांना वनविभागाच्या माध्यमातून झाली नाही. वन्यजीव कायद्यात सापाचा वन्यजीव उल्लेख असला तरी वन्यजीव हल्ल्यातील मदतीच्या जीआरमध्ये वन्यजीव म्हणून साप गाळल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळू शकत नाही. त्यामुळे वन्य जिवांमध्ये सापाचा उल्लेख करण्यात यावा, अशी मागणी ठरावात करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com