Sudhir Mungantiwar : साप वन्यजीव नसल्याने भरपाई देता येणार नाही

Wild Animal : साप हा वन्यजीव नसून, सर्पदंश हा विषय वन विभागाच्या अखत्यारित येत नाही. त्यामुळे इतर वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत आणि जखमी बाधितांना देण्यात येणारी नुकसान सर्पदंशाला देता येणार नाही.
Snake
SnakeAgrowon

Pune News : साप हा वन्यजीव नसून, सर्पदंश हा विषय वन विभागाच्या अखत्यारित येत नाही. त्यामुळे इतर वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत आणि जखमी बाधितांना देण्यात येणारी नुकसान सर्पदंशाला देता येणार नाही. तर सर्पदंशाबाबत स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून दोन लाख रुपयांची तरतूद असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत प्रश्‍नोत्तरादरम्यान दिली.

वन्यजीवांचे हल्ले रोखणे आणि उपाययोजनांबाबत आमदार रणधीर सावरकर, आशिष जयस्वाल, अतुल बेनके, विश्‍वजित कदम, संदीप क्षीरसागर आदी आमदारांनी विविध प्रश्‍न उपस्थित केले होते. या प्रश्‍नांमध्ये सर्पदंश, मगरींचे हल्ले, बिबट्यांचे हल्ले, रानडुक्कर, रोही, सांगलीमधील घोणस दंशामुळे होणारी जीवितहानी आदी विविध प्रश्‍नांवर मंत्री मुनगंटीवार यांनी उत्तरे दिली.

Snake
Minister Sudhir Mungantiwar : खरिपात बियाण्यांची टंचाई नकोः सुधीर मुनगंटीवार

या वेळी ‘जुन्नर आंबेगाव परिसरात वाढत्या बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नसबंदीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला होता. मात्र केंद्राने या प्रस्तावास अद्याप मान्यता दिली नाही. मात्र राज्य वन विभागाने यासाठी पिंजऱ्यांची संख्या वाढविली आहे. तसेच याविषयी कार्यवाहीचे अधिकार उपवनसंरक्षकांकडे देण्यात आल्याचे वनमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.

वनमंत्री काय म्हणाले...

- वन्य प्राण्यांनी धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत किंवा जखमींच्या मदतीबाबत सरकार गंभीर.

- पीक नुकसान भरपाई मर्यादा सहा हजारांवरून ५० हजार रुपये केली.

- वन्यप्राणी हल्ल्यातील मृतांच्या वारसांना २५ लाखांची मदत.

Snake
Sudhir Mungantiwar : राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळावर सुधीर मुनगंटीवार यांची निवड

मृताच्या कुटुंबीयांना नोकरी

बिबट्याच्या नसबंदीबाबत आमदार बेनके यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नावर मुनगंटीवार म्हणाले, ‘‘बिबट्याची व वाघाची वाढती संख्या हा विषय गंभीर आहे. नसबंदी संदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला असून, राज्य वन विभागाने यासाठी पिंजऱ्यांची संख्या वाढविली आहे.

त्याचबरोबर पर्यावरणाचे आणि वनांचे रक्षण करणारे गाव, गावकरी यांना संरक्षण देण्यासाठी सरकार अनुकूल आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात नागरिकांचा मृत्यू होणे, हे अत्यंत दुर्दैव आहे. त्यांच्या कुटुंबीयांना नोकरी देण्यासंदर्भात सरकार अनुकूल आहे. याविषयी प्रस्ताव तयार करण्याचा विचार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com