Farmer Issue : शेतकऱ्यांचे आर्थिक गणित यंदाही बिघडणार

Agriculture Issue : मागील खरीप हंगामात दुष्काळाचा सामना करावा लागल्यानंतर बैलाजोडी विक्रीचे प्रमाण वाढले आहे. तर दुसरीकडे यांत्रिकीकरणाने शेतीची मशागत सोपी झाली खरी, परंतु अलीकडच्या काळात महागाईमुळे यंत्रांच्या किमती वाढल्या.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon
Published on
Updated on

Ghansangvi News : मागील खरीप हंगामात दुष्काळाचा सामना करावा लागल्यानंतर बैलाजोडी विक्रीचे प्रमाण वाढले आहे. तर दुसरीकडे यांत्रिकीकरणाने शेतीची मशागत सोपी झाली खरी, परंतु अलीकडच्या काळात महागाईमुळे यंत्रांच्या किमती वाढल्या.

त्याला लागणारे डिझेल, पेट्रोलचे दर शेतकऱ्यांच्या आवाक्‍याबाहेर जात आहेत. त्यातच शेतीचा वाढता खर्च, अवकाळी पाऊस, शेतशिवारात मजुरांची कमतरता, शेतमालाला मिळत नसलेला योग्य भाव यामुळे यंदाही शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडणार आहे.

Indian Agriculture
Onion Harvesting : कांदा काढणीच्या कामाला वेग

पूर्वी शेतकरी शेतीची मशागत बैलांद्वारे करीत असत. बैलाद्वारे नांगरणी, वखरणी, पेरणी आदी कामे होतं. यामुळे शेतकऱ्याला फार खर्च येत नव्हता. आता मात्र शेती करण्याच्या पद्धतीत बदल झाला असून बैलजोडीची जागा आता ट्रॅक्‍टरने घेतली आहे.

शेतीकरिता ट्रॅक्‍टर महत्त्वाचे साधन झाले आहे. शेतातील बहुतांश कामे ट्रॅक्‍टरवर अवलंबून आहेत. परंतु दिवसेंदिवस होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे शेतीच्या मशागतीचे दर वाढले आहे. शेतीचा वाढता खर्च आणि उत्पन्न, शेतमालाला मिळणारा बाजारभाव यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेती सध्या तोट्याची ठरत आहे.

Indian Agriculture
Irrigation Department : पाटबंधारे विभागाचा मनमानी कारभार, ऊस बिलातून थेट पाणीपट्टीची केली वसुली

ट्रॅक्‍टरद्वारे मशागतीचे असे वाढले दर

खरिपाच्या सुरुवातीपासून नांगरटीसह पेरणी व इतर मशागतीच्या कामांसाठी ट्रॅक्‍टरचाच वापर होत आहे. गतवर्षी ट्रॅक्‍टरने नांगरटी आणि जमीन सपाट करण्यासाठी शेतकऱ्यांना एकरी एक हजार ८०० रुपये मोजावे लागले होते.

यंदा मात्र दोन हजार ५०० रुपये द्यावे लागत आहेत. याचबरोबर सरी सोडण्यासाठी एक हजार रुपये आकारले जात होते. आता यामध्ये ५०० रुपयांची वाढ झाली आहे. डंपिंगची एक खेप टाकण्यासाठी ३०० रुपयांऐवजी आता ५०० रुपये आकारले जात आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com