Irrigation Department : पाटबंधारे विभागाचा मनमानी कारभार, ऊस बिलातून थेट पाणीपट्टीची केली वसुली

Irrigation Department Kolhapur : चंदगड पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून थेट पाणीपट्टीची रक्कम कपात करण्यात आली आहे.
Irrigation Department
Irrigation Departmentagrowon

Irrigation Department Water Bill : चंदगड पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून थेट पाणीपट्टीची रक्कम कपात करण्यात आली आहे. साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग होण्यापूर्वी पाटबंधारे विभागाने परस्पर पैसे कपात केल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या जमीनी न मोजताच पैशाची वसुली केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कपात रकमेच्या पावत्याही शेतकऱ्यांना अद्याप मिळाल्या नसल्याने पाटबंधारे विभागाच्या कामावर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

चंदगड पाटबंधारे विभागाची ही पाणीपट्टी वसुलीची पद्धत चुकीची असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी आहे. चार वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांना कपात झालेल्या रकमेच्या पावत्याच मिळाल्या नाहीत. ओलम, अथर्व व इकोकेन या साखर कारखान्यांकडे असलेल्या शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून परस्पर रक्कम कपात केली जाते. सरसकट कपात केली जात असल्याने सामान्य शेतकरी भरडला जात आहे.

जमिनीची मोजणी करुन पाणीपट्टी आकारली पाहिजे, पण मोजणीदार कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याचे कारण पुढे करत पाटबंधारे विभाग अंदाजे रक्कम आकारुन पाणीपट्टी वसुल करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. ऊस बिलातून दरवर्षी पाणीपट्टी कपात करुन घेतली जाते. मात्र कपात केलेल्या रकमेच्या पावत्या शेतकऱ्यांना दिल्या जात नाहीत.

चालू वर्षी ओलम, अथर्व व इको केन या कारखान्याकडून जवळपास ६० लाखांची रक्कम आतापर्यंत कपात झाली आहे. पण अद्याप शेतकऱ्यांना पावत्या दिलेल्या नाहीत. पाणीपट्टीची रक्कम शेतकरी स्वतः भरण्याला तयार आहेत. यासाठी आकारणी योग्य पद्धतीने व्हावी व कपात करून घेतलेल्या रकमेच्या पावत्या तत्काळ शेतकऱ्यांना द्याव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

Irrigation Department
Tembhu Irrigation : ‘टेंभू’मुळे ७० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली

उसाचे मालक आम्ही. उधारीवर कारखान्याला ऊस देतो. कारखाना आम्हाला पंधरा ते वीस दिवसांनी उसाचे बिल आदा करते. मग आमच्या उसाच्या बिलातून साखर कारखाने पाणीपट्टीची रक्कम परस्पर का देतात. आमच्या मालाचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजेत. त्यातून आम्ही कुणाची देणी असतील तर ती आम्ही देऊ. त्यामुळे कारखान्यांनीही परस्पर पाणीपट्टीची रक्कम कपात करू नये. - नरसिंग बाचूळकर, शेतकरी, कागणी

पाणीपट्टीची आकारणी ही जुन्या दराप्रमाणे केली आहे. गेल्यावर्षीच्या पाणीपट्टीच्या पावत्या शेतकऱ्यांना दिल्या आहेत. काहींच्या कार्यालयात आहेत. यावर्षीच्या पावत्या काढण्याचे काम सुरु आहे. ज्या शेतकऱ्यांची पाणीपट्टीची रक्कम कार्यालयाकडे जमा आहे. त्या सर्व शेतकऱ्यांना पावत्या देण्यात येणार आहेत. तसेच शेतकऱ्यानी ७ नंबरचा फॉर्म भरुन आपल्या जमिनीच्या क्षेत्राची नोंद केल्यास पाणीपट्टीची योग्य आकारणी होण्याला मदत होईल.

-डी. आर. धोंडफोडे, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग, चंदगड

दर आकारणी

उसाची हेक्टरी पाणीपट्टी आकारणी - ११५० रुपये

रब्बी पिकाची हेक्टरी आकारणी २०० रुपये

चालू हंगामातील पाणीपट्टीची कपात रक्कम

ओलम साखर कारखाना - ३५ लाख ११ हजार ८७५,

इको केन-१८ लाख,

अर्थव शुगर्स - माहिती मिळाली नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com