LPG Gas Inflation : ‘उज्ज्वलां’च्या नशिबी पुन्हा चूल

Ujjwala Gas Holders Issue : रायगडमधील २५ हजार गृहिणींनी घरात गॅस शेगडी असूनही चुलीवर स्वयंपाक करणे सुरू केले असून अनेक वाड्या-वस्‍त्‍यांमध्ये लाकूडफाट्यासाठी शोधाशोध होताना दिसते.
Gas Holder Issue
Gas Holder IssueAgrowon
Published on
Updated on

Alibaug News : सर्वसामान्यांना भेडसावणारे गॅस सिलिंडरचे हजारी पार केलेले दर निवडणुकीच्या तोंडावर ९०० रुपयांपर्यंत आणण्यात आले; तरीही ते गोरगरिबांच्या आवाक्‍याबाहेर आहेत. परिणामी रायगडमधील २५ हजार गृहिणींनी घरात गॅस शेगडी असूनही चुलीवर स्वयंपाक करणे सुरू केले असून अनेक वाड्या-वस्‍त्‍यांमध्ये लाकूडफाट्यासाठी शोधाशोध होताना दिसते.

आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील महिलांची चुलीतील धुरापासून सुटका व्हावी म्हणून केंद्र सरकारने २०१६ मध्ये उज्ज्वला गॅस योजना सुरू केली आहे. वाढत्या महागाईत गॅस सिलिंडरचे दर परवडत नसल्याने महिला सरपण शोधण्यासाठी पुन्हा जंगलात फिरू लागल्या आहेत. लाकडे जाळण्यातून होणारी पर्यावरणाची हानी टाळण्यासोबतच महिलांचे आरोग्य सुधारावे म्हणून केंद्र सरकारने ही योजना गावोगावी राबवली होती.

Gas Holder Issue
LPG Gas Rate : गॅसच्या किंमत कपातीचे स्वागत, पण....

रायगड जिल्ह्यातही उज्ज्वला योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. गॅस सिलिंडर, शेगडी असे साहित्य कोणतेही शुल्क न आकारता वाटण्यात येत होते. मात्र, त्यानंतर प्रत्येक रिफिलिंगमधून शेगडी गॅस सिलिंडरचे पैसे वसूल करण्यात येऊ लागले. शिवाय मिळणारी सवलतही बंद झाली आहे.

घरगुती गॅसच्या किंमती दिवसेंदिवस वाढत असताना गरीब कुटुबांतील महिलांना प्रत्येक वेळेला गॅसचे पैसे देणे शक्य होत नसल्याने अनेक जणींना गॅस शेगडीचा वापर कमी केला. घरात गॅड शेगडी आहेत, परंतु सिलिंडर घेणे परवडत नसल्याने सांगण्यात येत आहे.

Gas Holder Issue
Gas Cylinder Rate : घरगुती गॅस दरात कपात, महागाईच्या झळा सोसणाऱ्या जनतेला थोडासा दिलासा
चुलीवर जेवण करण्याची सवय असल्याने गॅस शेगडीवर जेवण करताना सुरुवातीला तारांबळ उडत होती. त्यातच भाकऱ्या, अंघोळीचे पाणी गरम करणे गॅसवर परवडत नाही. गॅसचा वापर करताना घरात चूल पेटलेलीच असायची, आता सिलिंडरच्या किमती वाढल्‍या आहेत. त्‍या परवडत नसल्‍याने चुलीचा नियमित वापर सुरू केला आहे.
सुशीला पाटील, गृहिणी, मुरूड

नवीन जोडण्या देण्यास टाळाटाळ

रायगड जिल्ह्यात ऑगस्ट २०१९ पासून उज्ज्वला गॅस योजनेतून नवीन जोडणी देणेच बंद झाले आहे. केंद्र शासनाने ही योजना राबवताना ८ कोटी जोडणीचे ध्येय दिले होते. केंद्राने ठरवून दिलेली संख्या पूर्ण झाल्याने नवीन जोडण्या देण्यास गॅस कंपन्यांकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे काही महिलांची इच्छा असूनही नवीन जोडण्यात अडथळे येत आहेत.

६३ हजार ७८४ गॅस जोडण्या : उज्ज्वला गॅस जोडण्या देण्यात रायगड जिल्हा राज्यात अव्वल होता. कमीत कमी कागदपत्रात मोफत शेगडी आणि गॅस सिलिंडर मिळत असल्याने पहिल्या दोन वर्षात ६३ हजार ७८४ गॅस जोडण्या देण्यात आल्‍याची माहिती जिल्हा पुरवठा कार्यालयातून देण्यात आली.

सुपारीच्या बागेची साफसफाई करण्याचे काम मी मजुरीवर करते. दिवसभर काम करताना लाकूडफाटा जमा होतो, तो त्याच ठिकाणी न जाळता त्याची मोळी करून घरात आणते. मोल मजुरी करणाऱ्यांना गॅस सिलिंडरची घेणे परवडत नसल्‍याने हा बिनखर्चाचा मार्ग सोयीचा वाटतो.
सुशीला निर्गुटकर, गृहिणी, अलिबाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com