Gas Cylinder Rate
Gas Cylinder Rateagrowon

Gas Cylinder Rate : घरगुती गॅस दरात कपात, महागाईच्या झळा सोसणाऱ्या जनतेला थोडासा दिलासा

Gas Rate : घरगुती गॅस एलपीजीच्या किमतीत २०० रुपये सबसिडी देण्याची घोषणा मंत्रिमंडळाने केली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.
Published on

Domestic Gas Cylinder Rate : महागाईच्या झळा सोसणाऱ्या जनतेला केंद्र सरकारने रक्षाबंधन आणि ओणमच्या दिवशी मोठा दिलासा दिला आहे. घरगुती गॅस एलपीजीच्या किमतीत २०० रुपये सबसिडी देण्याची घोषणा मंत्रिमंडळाने केली. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना २०० रुपये अतिरिक्त अनुदान दिले जाईल. म्हणजेच त्यांना गॅस सिलिंडरवर ४०० रुपयांची सूट मिळणार आहे.

घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवर २०० रुपये सबसिडी देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. महागाईने होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने रक्षाबंधन आणि ओणमच्या दिवशी मोठी घोषणा केली आहे. गॅस सिलिंडरच्या किमतीत सर्व ग्राहकांना २०० रुपयांपर्यंत सबसिडी दिली जाईल.

उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आधीपासून मिळत असलेल्या २०० रुपयांच्या अनुदानाव्यतिरिक्त २०० रुपये वेगळे अनुदान दिले जाणार आहे. म्हणजेच त्यांना गॅस सिलिंडरवर ४०० रुपयांची सूट मिळणार आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही घोषणा केली.

केंद्रीय मंत्री ठाकूर म्हणाले की, याआधी १ ऑगस्ट रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १०० रुपयांनी कपात केली होती. याचबरोबर ७५ लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शनही दिले जाणार आहेत. त्यांना पाईप आणि शेगडी मोफत दिला जाणार आहे.

Gas Cylinder Rate
Raju Shetti Vs Hasan Mushrif : मुश्रीफांच्या रक्तपाताच्या वक्तव्यावरून राजू शेट्टींनी घेतला समाचार

केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झाली. चांद्रयान मिशन ३ च्या यशामुळे देश आणि जगात आपला दर्जा उंचावला आहे. हे यश म्हणजे भारताच्या प्रगतीची प्रगती आहे.

आता २३ ऑगस्ट हा राष्ट्रीय अवकाश दिवस म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री म्हणाले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश आहे. मंत्रिमंडळाने चांद्रयान ३ शी संबंधित सर्वांचे कौतुक त्यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com