Surya River Bridge : जीवघेणा प्रवास संपता संपेना

Student Travelling Issue : डहाणू तालुक्यातील कोसेसरी भवाडी येथील नागरिकांना आजही जीव धोक्यात घालून सूर्या नदीतून प्रवास करावा लागतो.
Student Travel Issue
Student Travel IssueAgrowon

Mumbai News : डहाणू तालुक्यातील कोसेसरी भवाडी येथील नागरिकांना आजही जीव धोक्यात घालून सूर्या नदीतून प्रवास करावा लागतो. त्याकरिता या नदीवर पूल बांधावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. त्यानुसार २१ कोटींचा पूल उभारण्यासाठी मंजुरी देण्यात आली. तसेच, चार महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यापूर्वी पुलाच्या कामाचे उद्‍घाटन करण्यात आले. मात्र, पावसाळ्यापूर्वी हा पूल बांधून पूर्ण न झाल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांना होडीतून प्रवास करण्याची वेळ येत आहे.

कोसेसरी गावाजवळ सूर्या नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहते. त्यामुळे कोसेसरी भवाडी आणि लगतच्या तीन-चार गावांतील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी कासा येथे यावे लागते. शाळेत जाण्यासाठी या मुलांना लाकडी तराफ्यात अथवा लाकडी नावेत बसून नदी ओलांडून जावे लागते. मागील अनेक वर्षांपासून या नदीवर पूल व्हावा, अशी गावकऱ्यांची मागणी आहे; पण याकडे कुणीच लक्ष दिले नव्हते, असे ग्रामस्थ सांगतात.

Student Travel Issue
Maharashtra Rain : तीन जिल्ह्यांत पावसाचा जोर कमीच

कासा अथवा तलवाडा येथे येण्यासाठी दुसरीकडून १८ ते २० किलोमीटर वळसा घालून यावे लागते. त्यात तेथून प्रवासी वाहनांची कमतरता आहे. त्या प्रवासासाठी भाडे व वेळदेखील जास्त लागते. त्यामुळे विद्यार्थी या नदीपात्रातून प्रवास करतात. यामुळे त्यांचा प्रवास धोकादायक असल्याचे पालक सांगतात. मागील अनेक वर्षांपासून विद्यार्थी, नागरिकांचा प्रवास अशाचप्रकारे सुरू आहे. त्यामुळे हा धोकादायक प्रवास सुखकर व्हावा, यासाठी नदीवर पूल बांधण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत होती. शेवटी या पुलाच्या बांधकामासाठी २१ कोटी निधी मंजूर झाला असून उद्‍घाटन करूनसुद्धा कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली नाही.

Student Travel Issue
Rain Update : इंदापूर तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद

घाईगडबडीत उद्‍घाटन

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी एक दिवस अगोदर या पुलाची मान्यता आणि २१ कोटी निधी मंजूर करण्यात आला. या पुलाच्या कामाचे घाईगडबडीमध्ये उद्‍घाटन समारंभदेखील करण्यात आला होता. यासाठी पालघरचे तत्कालीन खासदार राजेंद्र गावित, डहाणूचे आमदार विनोद निकोले, पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा हेदेखील उपस्थित होते.

कोसेसरी भवाडी हा मोठा पूल असून जवळपास २१ कोटी खर्च होणार आहेत. त्याची मंजुरी, वर्कऑर्डर व निधी या गोष्टी झालेल्या आहेत. पुलाच्या बांधकामापूर्वी माती परीक्षण व अन्य गोष्टी केल्या आहेत. पुलाची डिझाईन मंजुरीसाठी पाठवली आहे. पावसाळा संपताच या पुलाच्या कामास सुरुवात केली जाईल. वर्षभरात हा पूल तयार होईल.
सचिन पाटील, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, पालघर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com