Rain Update : इंदापूर तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद

Indapur News : पुणे : चालू वर्षी पावसाचा जवळपास सव्वा महिना झाला आहे. दर वर्षी पूर्व भागात कमी पाऊस पडत असला तरी इंदापूर तालुक्यात यंदा सर्वाधिक पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
Rain Update
Rain Update Agrowon
Published on
Updated on

संदीप नवले / अॅग्रोवन वृत्तसेवा
Pune News : पुणे : चालू वर्षी पावसाचा जवळपास सव्वा महिना झाला आहे. दर वर्षी पूर्व भागात कमी पाऊस पडत असला तरी इंदापूर तालुक्यात यंदा सर्वाधिक पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. यंदा एक जून ते १० जुलै या काळात सरासरीच्या १२८.३ मिलिमीटरपैकी २९९.९ मिलिमीटर म्हणजेच २३३ टक्के पाऊस इंदापुरात पडल्याची नोंद झाली आहे.इंदापूर तालुक्यात जून महिन्यात १०२.१ मिलिमीटरपैकी २४७.४ मिलिमीटर म्हणजेच २४२.३ टक्के पाऊस पडला होता. तर एक ते १० जुलै दरम्यान सरासरीच्या २६.२ मिलिमीटरपैकी ५२.५ मिलिमीटर पाऊस पडला आहे.

जून महिन्यात सणसर, भिगवण, इंदापूर, लोणी, काटी, निमगाव या सर्वच मंडलांत २०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला आहे. इंदापूर तालुक्यात एकूण आठ मंडले आहेत.यामध्ये सर्वाधिक पाऊस हा सणसर मंडलात पडला. या मंडलात एक ते १० जुलै दरम्यान सरासरीच्या १२८.३ मिलिमीटरपैकी ४८८.७ मिलिमीटर म्हणजेच ३८० टक्के पाऊस पडला. विशेष म्हणजे जून महिन्यात या मंडलात चांगलाच पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

Rain Update
Rain Update : जूनमध्ये पुणे जिल्ह्यात ९७ टक्के पावसाची नोंद

जूनमध्ये सरासरीच्या १०२.१ मिलिमीटरपैकी ४०७.५ मिलिमीटर म्हणजेच ३९९ टक्के एवढा पाऊस पडला. तर जुलैमध्ये २६.२ मिलिमीटरपैकी ८१.२ मिलिमीटर एवढा पाऊस पडला आहे. हा पाऊस मागील दहा वर्षांतील सर्वाधिक पाऊस असल्याचे बोलले जात आहे.  
एक जून ते १० जुलै या काळात झालेला मंडलनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)


मंडल सरासरी पाऊस पडलेला पाऊस टक्केवारी
भिगवण १२८.३ २७६.६ २१५
इंदापूर १२८.३ ३०८.२ २४०
लोणी १२८.३ २९४.२ २२९
बावडा १२८.३ २५२.४ १९६
काटी १२८.३ २८३.० २२०
निमगाव १२८.३ २८३.२ २२०
अंथुर्णे १२८.३ २१२.९ १६५
सणसर १२८.३ ४८८.७ ३८०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com