
Pune News: ‘सकाळ-ॲग्रोवन स्मार्ट व्हिलेज प्रकल्प’ अंतर्गत बोरी बुद्रुक गावच्या संपूर्ण शेतजमीन मोजणीच्या नकाशाचे (क पत्रक) वाटप शनिवारी (ता. २४) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती प्रकल्पाचे समन्वयक अमोल कोरडे यांनी दिली.
दरम्यान, या प्रकल्पांतर्गत ८२ टक्के मोजणी पूर्ण झाली आहे. यामध्ये एकूण १ हजार ७७७ गटांपैकी, १ हजार ४६४ गटांची मोजणी पूर्ण झाली आहे. तर ३१३ गटांच्या मोजणीचे काम प्रगतिपथावर असल्याचेही कोरडे यांनी सांगितले.
या बाबत कोरडे म्हणाले, ‘‘सकाळ-ॲग्रोवन स्मार्ट व्हिलेज प्रकल्प’अंतर्गत बोरीसह वडगाव (कांदळी), काळवाडी, पारगावतर्फे आळे व शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी या गावांचा समावेश ४ जानेवारी २०२७ मध्ये झाला होता. या प्रकल्पांतर्गत मुख्यमंत्री योजनेतून ग्राम परिवर्तन प्रवर्तकाची निवड करण्यात आली.
सहभागी पाच गावांच्या सहमतीनुसार या गावांमधील शेतजमीन मोजणीची मागणी ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या माध्यमातून शासन दरबारी करण्यात आली होती. यावर तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव, तहसीलदार आशा होळकर यांनी बोरी बुद्रुक गावाला भेट दिली व ही योजना स्मार्ट व्हिलेज प्रकल्प जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने पूर्ण केली जाईल, असे सांगितले.
त्याबरोबरच स्मार्ट व्हिलेज प्रकल्पांतर्गत या योजनेस सुरुवात करण्यात आली. यानंतर जमीन मोजणीची प्रक्रिया राबविण्यासंदर्भात प्रांताधिकारी कल्याण पांढरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठका झाल्या. यानंतर ऑक्टोबर २०१७ मध्ये त्यांनी सॅटेलाइट सर्वे करिता टेंडर प्रोसेस झाल्यानंतर मोजणी २०१८ मध्ये जमीन मोजणी समितीच्या अध्यक्ष रंजन जाधव व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष युवराज कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतजमीन मोजणीचे काम सुरू झाले.’’
कोरडे यांनी ‘वार्ड ते वार्ड, वस्ती ते वस्ती’ मोजणी बाबत बैठका घेऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केल्याने व त्यांचे सर्व प्रश्न घरोघरी जाऊन जाणून घेतले. लोकांच्या शंका मूलभूत प्रश्न जाणून घेतले. प्रक्रियेमध्ये त्रिस्तरीय रचना कार्यान्वित झाल्याने सरपंच बोरी बुद्रुक, अध्यक्ष मोजणी समिती व अध्यक्ष तंटामुक्ती समिती यांनी मोजणीचे काम पूर्णत्वास नेले.
मोजणी प्रक्रियेत रोवर मशिनची नितांत आवश्यकता असताना त्याचवेळी रोवर मशीन आणि ड्रोन उपलब्ध करून दिल्याने मोजणी प्रक्रिया सुलभ झाली, असेही कोरडे यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.