Sharad Pawar : सध्याचे केंद्रातील सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात: शरद पवार

Politics Update : ‘‘सध्याचे सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधातील सरकार असून, शेतीच्या पिकाला कुठल्याही प्रकारे चांगला बाजारभाव मिळत नसल्याने या सरकारला योग्य जागा दाखवायची हीच वेळ आहे,’’
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon

Junnar News : ‘‘सध्याचे सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधातील सरकार असून, शेतीच्या पिकाला कुठल्याही प्रकारे चांगला बाजारभाव मिळत नसल्याने या सरकारला योग्य जागा दाखवायची हीच वेळ आहे,’’ अशी टीका माजी केंद्रीय मंत्री शरद पवार डॉ.अमोल कोल्हे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मंगळवारी (ता.३०) आयोजित प्रचार सभेत बोलत होते.

Sharad Pawar
Sharad Pawar Party Manifesto : एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाकडून जाहीरनामा प्रसिद्ध; घरगुती गॅस, सरकारी नोकऱ्यांसह महिला आरक्षणाचा मुद्द्यांचा समावेश

या प्रसंगी विघ्नहर अध्यक्ष सत्यशील शेरकर, माजी आमदार अशोक पवार, बाळासाहेब दांगट, दिलीप ढमढेरे, राम कांडगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, उपाध्यक्ष अनंतराव चौगुले, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक संभाजी तांबे, तालुकाध्यक्ष माऊली खंडागळे, शिवसेना हिंगोली संपर्कप्रमुख बबन थोरात व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी शरद पवार म्हणाले, की आत्ताच्या पंतप्रधानांना संसदीय पद्धतीवर विश्वास नाही. या देशाचे संविधान धोक्यात असून राज्यातील फॉक्स कॉन उद्योग राज्याबाहेर गेला, त्यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी आवाज उठवला नाही, हे शरण गेलेले लोक आहेत. जर मोदी परत आले तर जीएसटी, पेट्रोल, सर्व क्षेत्रांतील दर आणखीनच वाढले जाणार आहेत.

Sharad Pawar
Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती पुतीनसारखीच

या वेळी खासदार कोल्हे पंतप्रधान मोदी यांचे नाव न घेता म्हणाले, की शरद पवारांना ते भटकती आत्मा म्हणाले. त्यांना सांगू इच्छितो, होय पवार साहेब भटकती आत्मा आहे. आजच्या शेतकरी, कष्टकरी युवकांचा ते आत्मा आहेत. भूज (गुजरात) येथे भूकंप झाला तेव्हा विरोधाला विरोध न करता तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पुनवर्सनाच्या कामासाठी शरद पवारांना पाठवले.

कारण त्यांना त्याचा अनुभव होता म्हणून. महिलांना आरक्षण देणारे पवार साहेबच होते. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करणारा आत्मादेखील पवार साहेबच होते. हा आत्मा भटकतो तो शेतकरी हितासाठी. हा आत्मा तरुणांच्या रोजगारासाठी भटकतो. हो त्या आत्म्यास आम्ही कायम जपतो, अशा शब्दात कोल्हे यांनी पंतप्रधान मोदी यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com