Sharad Pawar Party Manifesto
Sharad Pawar Party ManifestoAgrowon

Sharad Pawar Party Manifesto : एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाकडून जाहीरनामा प्रसिद्ध; घरगुती गॅस, सरकारी नोकऱ्यांसह महिला आरक्षणाचा मुद्द्यांचा समावेश

NCP Sharad Pawar Party Manifesto : राज्यासह देशात लोकसभा निवडणूक जोर धरत आहे. यासाठी राज्यासह देशातील प्रमुख पक्ष आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करत आहेत. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून देखील लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात हमीभाव, घरगुती गॅस सिलेंडर, कंत्राटी भरती, जातनिहाय जनगणनेसह महिला आरक्षणासह अनेक मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे.

Pune News : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशातील प्रमुख पक्षांकड़ून जाहीरनामे प्रसिद्ध करण्यात येत आहेत. यादरम्यान राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाने देखील आपला जाहीरनामा गुरूवारी (ता.२५) प्रसिद्ध केला. याला ‘शपथनामा’ असं नाव देण्यात आले असून माजी खासदार वंदना चव्हाण यांच्या नेतृत्त्वात पक्षाचा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहमबूब शेख, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीरनाम्यातील घोषणांची माहिती देताना भाजपवर टीका केली. तसेच पवार यांनी देखील भाजपवर निशाना साधताना, भाजपने १० वर्षात काय केले असा सवाल केला आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान २६ एप्रिल रोजी होणार आहे. मात्र अनेक मतदार संघातील प्रचार थंडावला असतानाच तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील प्रचारला धार आली आहे.  यादरम्यान एनसीपी शरदचंद्र पवार गटाकडून आज जाहीरनामा जनतेसमोर ठेवण्यात आला. जाहीरनाम्यातून गॅस-सिलेंडरचे दर, महिला आरक्षण, जीएसटी, शासकीय नोकऱ्या आणि कंत्राटी भरती या मुद्द्यांना हात घालण्यात आला आहे. 

Sharad Pawar Party Manifesto
Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती पुतीनसारखीच

हा जाहीरनामा नसून हा ‘शपथनामा’ असल्याचे शरद पवार म्हणाले. तसेच या शपथनाम्यातून गॅस, महिलांना आरक्षण, शासकीय नोकऱ्या, कंत्राटी भर्तीसह अनेक विषयांसंदर्भात घोषणा करण्यात आल्या आहेत. आम्ही मर्यादित जागा लढवत असून विविध प्रश्नांवर आम्ही लढणार आहोत. यासाठी आमचे लोक आवाज उठवतील असेही पवार म्हणाले.

यावेळी जयंत पाटील यांनी, भाजपवर टीका करताना, मागच्या १० वर्षात मतदारांची फसवणूक झाली असून महागाई वाढली आहे. मागील ४५ वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी दर भाजपच्या १० वर्षांच्या काळात झाला आहे. शेतकऱ्यांची दुरावस्था झाली असून कॉर्पोरेटसाठी पक्षपाती धोरणं भाजप राबवत आहे. तर आपली सत्ता यावी म्हणून सरकारी यंत्रणाचा गैरवापर केला जातोय असाही आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. 

हा जाहीरनामा तयार करणाऱ्या समितीत वेगवेगळ्या क्षेत्रात लोकं असून जे आमच्या पक्षाचे लोक खासदार म्हणून जातील त्यांना हे विषय कमी पडतील. महिला आणि मुली, शेतकरी, कामगार, दिव्यांग, तृतीयपंथी यांच्यासाठी हा जाहीरनामा आहे. तरूणांच्या विचारांनुसार पर्यावरण, नागरी विकास, आणि आरोग्यावर जाहीरनामा तयार केल्याचे वंदना चव्हाण म्हणाल्या.

Sharad Pawar Party Manifesto
Sharad Pawar : 'बोट धरून शिकलो म्हणणारेच आज भूमिका बदलत आहेत'; शरद पवार यांची मोदींवर टीका

जाहीरनाम्यातून मांडलेले महत्वाचे मुद्दे

शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत दर देण्यासाठी शेतकरी आयोग निर्माण करू

शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर शून्य टक्के जीएसटी लावणार

स्वयंपाक घरातील गॅसच्या किमती ५०० रुपयांपर्यंत निश्चित करणार

गॅसच्या किमती निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारची मदत घेऊन सबसीडी आणू

शासकीय नोकऱ्यांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण 

जाहीरनाम्यातून मांडलेले महत्वाचे मुद्दे

महिला आणि मुलींसाठी स्त्री शिक्षणातील अडथळे दूर करू

वाढत्या माहागाईचे मुख्य कारण हे पेट्रोल आणि डिजेलवरील कर असून त्याची पुनर्रचना करू

सरकारमध्या सामील झाल्यास केंद्रातील ३० लाखांहून अधिक शासकिय नोकऱ्या भरू 

देशात अप्रेंटिस कायदा मंजूर करून डिग्री आणि डिप्लोमामध्ये पदवी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी स्टायपेंडची व्यवस्था

स्पर्धा परीक्षांसाठी आकारले जाणारे शुल्क माफ 

जाहीरनाम्यातून मांडलेले महत्वाचे मुद्दे

शिक्षणासाठी अर्थसंकल्पीय तरतूद ६ टक्क्यांपर्यंत आणू 

शासकीय नोकर भर्तीवर लक्ष देतान कंत्राटी भर्ती बंद करू 

अग्निवीर योजना आम्ही बंद करणार

शाळा कॉलेजमध्ये सेफ्टी ऑडिट करणार

जातीनिहाय जनगणना करू

प्रत्येक गरीब महिलेला वार्षिक १ लाख देऊ

अंगणवाडी कर्मचाऱ्यांची संख्या वाढणार वाढवणार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com