Agri Hackathon: पुण्यात होणार देशातील पहिले ‘कृषी हॅकेथॉन’

Agriculture Innovation: अॅग्री हॅकेथॉन हा राज्यातील कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी समावेश करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. शेतकऱ्यांसाठी उत्पादनक्षमता वाढवण्यास आणि अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी नवीन उपाय शोधण्यासाठी हा हॅकेथॉन आयोजित केला जात आहे.
Ai For Agriculture Hackathon
Ai For Agriculture HackathonAgrowon
Published on
Updated on

Pune News: कृषी क्षेत्रात नावीन्य आणि तंत्रज्ञानाच्या आधारे परिवर्तन घडवण्यासाठी राज्यातील, देशातील नव उद्योजकांच्या सहकार्याने भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय ‘कृषी हॅकेथॉन २०२५’ आयोजित करण्यात येणार आहे. हे हॅकेथॉन शासनाच्या वतीने एक ते तीन जून या कालावधीत पुणे येथे घेण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे देशातील कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाधिष्ठित नवोपक्रमांना चालना मिळणार असून, आधुनिक व तांत्रिक उपाय शोधण्यात एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

महाराष्ट्र शासनांतर्गत असलेल्या कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि पुणे कृषी महाविद्यालय यांचे सहकार्य लाभले आहे. ‘अॅग्री हॅकेथॉन २०२५’ हा कृषी क्षेत्रातील नवप्रवर्तन, संवाद आणि सहकार्याला चालना देणारा देशातील सर्वांत मोठा मंच ठरणार आहे. देशभरातील तरुण तंत्रज्ञ, स्टार्टअप्स,

उ‌द्योग क्षेत्रातील नेते, शासकीय अधिकारी एकत्र येऊन भारतीय कृषी क्षेत्रातील प्रमुखसमस्यांवर वेगवान, प्रभावी व खर्चिकदृष्ट्या योग्य उपाय शोधतील. या हॅकेथॉनमध्येविद्यार्थी, नवप्रवर्तक, स्टार्टअप्स आणिसंशोधक विविध स्तरांवर सहभागी होऊ शकतात. आंतरशाखीय सहकार्य, संशोधन व तंत्रज्ञानाच्या आधारे प्रत्यक्षात अमलात आणता येणार आहे.

Ai For Agriculture Hackathon
Agri Hackathon: ‘अ‍ॅग्री हॅकॅथॉन’द्वारे कृषी क्षेत्रात नावीन्याची क्रांती!

स्पर्धा व पारितोषिके

कृषी क्षेत्रातील विविध समस्यांचे आठ प्रकारांत वर्गीकरण करण्यात आले असून, त्यावर स्पर्धकांनी उपाययोजना (सोल्यूशन) शोधायचे आहे. सर्वोत्तम सोल्यूशन सादर करणाऱ्या स्पर्धकांची प्रत्येक गटामध्ये प्रथम व द्वितीय पारितोषिकासाठी तज्ज्ञ समितीमार्फत निवड करण्यात येणार आहे.

प्रथम विजेत्यास २५ लाख रुपये (प्रत्येक क्षेत्रातील आठ विजेते) व द्वितीय विजेत्यास १५ लाख रुपये (प्रत्येक क्षेत्रातील आठ उपविजेते) पारितोषिक म्हणून दिले जाईल. राज्यातील स्पर्धकांकडून आलेल्या उपाययोजना व सोल्यूशन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचे उत्पादन व विपणन प्रोत्साहन म्हणून हे पारितोषिक, निधी व मार्गदर्शनाच्या संधीही दिल्या जातील.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय भागीदारी

या हॅकेथॉनला नेचर ग्रोथ (इस्राईल) व नेदरलँड्सच्या दूतावासातील कृषी विभाग या आंतरराष्ट्रीय भागीदारांचा पाठिंबा आहे. तसेच बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर, आयसीएईआर, कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि नाबार्ड (राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक) या राष्ट्रीय संस्थाही सहभागी आहेत.

Ai For Agriculture Hackathon
International Agri Hackathon India: ‘अॅग्री हॅकॅथॉन’च्या संकेतस्थळाचे अनावरण

नोंदणीसाठी अर्ज सुरू

अॅग्री टेक नवप्रवर्तकांनी या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. स्पर्धकांना https://www.puneagrihackathon.com या संकेतस्थळावर ५ मेपर्यंत अर्ज करता येतील. आलेल्या अर्जांची पडताळणी करून स्पर्धकांची यादी १५ मेपर्यंत अंतिम करण्यात येईल.

या विषयावर उपाययोजना शोधणार

कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)

जलसंधारण व मृद्‍ व्यवस्थापन

कृषी यांत्रिकीकरण

पीक संरक्षण (खते व कीटकनाशके)

कृषीसाठी अक्षय ऊर्जा

कापणीपश्चात तंत्रज्ञान व कचरा व्यवस्थापन

कृषी अर्थशास्त्र व पुरवठा साखळी

इतर नावीन्यपूर्ण अॅग्री टेक संकल्पना (एआय वगळून)

राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याबरोबरच, कृषी क्षेत्रातील समस्यांवर आधुनिक व तांत्रिक उपाय शोधण्यासाठी ‘अॅग्री हॅकेथॉन’ उपयुक्त ठरेल. कृत्रिम बु‌द्धिमता (एआय) सारख्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर हा राज्याच्या शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी अत्यावश्यक आहे.
अजित पवार, उपमुख्यमंत्री
हा हॅकेथॉन कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी समावेश करण्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. तरुण नवप्रवर्तकांना शेतकऱ्यांना मदत करणारे, उत्पादनक्षमता वाढवणारे व अन्नसुरक्षा सुनिश्चित करणारे उपाय तयार करण्यासाठी प्रेरणा देणे हा यामागचा उ‌द्देश आहे.
जितेंद्र दुडी, जिल्हाधिकारी, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com