Water Crisis : मराठवाड्यातील आठ लघू प्रकल्प अजूनही कोरडेच

Water Scarcity : मराठवाड्यातील एकूण ७४९ लघू प्रकल्पांपैकी आठ प्रकल्प अजूनही कोरडे आहेत. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील सात व धाराशिवमधील एका प्रकल्पाचा समावेश आहे.
Water Crisis
Water CrisisAgrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील एकूण ७४९ लघू प्रकल्पांपैकी आठ प्रकल्प अजूनही कोरडे आहेत. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील सात व धाराशिवमधील एका प्रकल्पाचा समावेश आहे. याशिवाय ८६ लघू प्रकल्पातील पाणीसाठा अजूनही जोत्याखालीच असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली.

पाणीसाठा चौथ्याखाली असलेल्या ८६ लघू प्रकल्पात छत्रपती संभाजीनगरमधील १६, जालन्यातील ७, बीडमधील २३, लातूरमधील पाच, धाराशिवमधील ३४ तर नांदेड मधील एका लघू प्रकल्पाचा समावेश आहे. याशिवाय सहा मध्यम प्रकल्पातील पाणीसाठाही जोत्याखालीच आहे. त्यामध्ये धाराशिवमधील तीन, जालन्यातील दोन, तर छत्रपती संभाजीनगरमधील एका मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे.

Water Crisis
Marathwada Water Crisis : मराठवाड्यातील ४७ प्रकल्प तहानलेलेच

७४९ लघू प्रकल्पांपैकी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९८ लघू प्रकल्पांत ३३ टक्के, जालनामधील ५७ लघू प्रकल्पांत ५२ टक्के, बीडमधील १२६ प्रकल्पांत ६१ टक्के, लातूरमधील १३४ प्रकल्पांत ७५ टक्के, धाराशिवमधील २०६ प्रकल्पांत ५० टक्के, नांदेडमधील ८० प्रकल्पात ९४ टक्के, परभणीमधील २२ प्रकल्पांत ८८ टक्के, तर हिंगोलीतील २७ लघू प्रकल्पांत ९५ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

Water Crisis
Water Crisis : तीन महिने उलटूनही प्रकल्प कोरडेच

मध्यम ७५ प्रकल्पांपैकी छत्रपती संभाजी नगर मधील १६ प्रकल्पांत सर्वांत कमी २७ टक्के, जालनामधील सात प्रकल्पांत ४४ टक्के, बीडमधील १६ प्रकल्पांत ९१ टक्के, लातूरमधील आठ प्रकल्पांत ६३ टक्के, धाराशिवमधील १७ प्रकल्पांत ४३ टक्के, नांदेडमधील नऊ प्रकल्पांत ९६ टक्के, तर परभणीतील दोन मध्यम प्रकल्पांत शंभर टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

उपयुक्त पाणीसाठा ७४ टक्क्यांवर

मराठवाड्यातील एकूण ८७७ प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा ७४.७५ टक्क्यांवर पोहोचला आहे. यामध्ये मोठ्या ११ प्रकल्पांतील ८२.२९ टक्के पाणीसाठ्यासह मध्यम ७५ प्रकल्पांतील ६०.९७ टक्के, ७५० लघू प्रकल्पांतील ६१.८८ टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांमधील ६१.८ टक्के, तसेच तेरणा, मांजरा, रेना, नदीवरील २७ बंधाऱ्यांमधील ७३.१५ टक्के उपयुक्त पाण्यासाठी समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com