SIT Investigation : बीड जाळपोळ प्रकरणी एसआयटी

Devendra Fadanvis : बीड, माजलगाव येथे जी जाळपोळ झाली, त्याची एसआयटी मार्फत चौकशी केली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
Beed Arson Incident
Beed Arson IncidentAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : बीड, माजलगाव येथे जी जाळपोळ झाली, त्याची एसआयटी मार्फत चौकशी केली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तत्पूर्वी जयंत पाटील यांनी या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर जोरदार प्रहार केला. तर आमदार संदीप क्षीरसागर यांनी घराची जाळपोळीचा थरार सांगत गंभीर आरोप केले.

मराठा आरक्षणाचे निमित्त साधून ३० ऑक्टोबरला माजलगाव आणि बीड येथे मोठी जाळपोळ करण्यात आली. या बाबत नेमकी काय कारवाई केली, अशी विचारणा आमदार संदीप क्षीरसागर, जयंत पाटील, रोहित पवार यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून केली. यावर शुक्रवारी (ता. १५) विधानसभेत जवळपास ४० मिनिटे जोरदार चर्चा झाली.

Beed Arson Incident
Beed Violence : जाळलेलं घरं, फोडलेलं हॉटेल अन् राख झालेली गाडी

चर्चेची सुरुवात करतातच आमदार क्षीरसागर यांनी त्या दिवशीचा सर्व घटनाक्रम सांगितला. बीड येथे त्या दिवशी एका गटाने जाळपोळ करण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, ‘सकाळपासून टप्प्याटप्प्याने लोक एकत्र जमले. त्यांचा हा जमाव वाढत गेला. पोलिसांनी तत्काळ कारवाई केली असती तर पुढील अनर्थ टळला असता. मात्र त्यांनी बघ्याची भूमिका घेतली.

हे जमलेले लोक माझ्या घराच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांशी संपर्क केला. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. तोपर्यंत हे लोक घरापर्यंत पोहोचले. त्यांनी घराची लाइट व पाण्याची पाइप तोडली. आंदोलक आल्याचे पाहून पोलिस निघून गेले. मी बाहेरगावी होतो. घरात पत्नी आणि मुलगा होता.

Beed Arson Incident
Onion rate : केंद्र पथकाच्या अहवालाने केला कांदा उत्पादकांचा घात!

त्या लोकांनी घराला आग लावली. मुलगा सातत्याने फोन करून मला बोलवत होता. घर जळत होते. मात्र पोलिसांनी काहीही केले नाही. या जमावाने घरावर फॉस्फरस बॉम्ब, पेट्रोल बॉम्ब टाकले. त्यानंतर काकांच्या व नंतर शिवाजी पंडित यांच्या घरावर हल्ला झाला. तरीही पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून याचा मास्टर माईंड शोधा,’ अशी मागणी त्यांनी केली. आमदार जयंत पाटील यांनी, पोलिस व कायदा सुव्यवस्थेचा पंचनामा केला. या प्रकरणात गुप्तचर विभागाला अपयश आल्याची टीका त्यांनी केली.

मराठा आंदोलन बदनाम करू नका
मराठा आरक्षणासाठी शांततेत आंदोलन चालू होते. या जाळपोळीचा आणि आंदोलनकर्त्यांचा काहीही संबंध नाही. काही गुन्हेगारी स्वरूपाच्या लोकांनी हा पूर्वनियोजित हल्ला केला आहे. त्यामुळे मराठा आरक्षण बदनाम करू नये. गुन्हेगार कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com