Palkhi Sohala 2024 : संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माउली पालख रथाचे फलटणला आगमन

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi : ‘माउली माउली, विठ्ठल विठ्ठल’ नामाचा गजर, टाळ-मृदंगाच्या निनादात संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माउली पालखी रथाचे मंगळवारी (ता. ९) फलटण येथे आगमन झाले.
Palkhi Sohala 2024
Palkhi Sohala 2024 Agrowon

Satara News : ‘माउली माउली, विठ्ठल विठ्ठल’ नामाचा गजर, टाळ-मृदंगाच्या निनादात संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माउली पालखी रथाचे मंगळवारी (ता. ९) फलटण येथे आगमन झाले. शनिवारी आगमन झालेला पालखी सोहळा जिल्ह्यात मुक्कामास असल्याने भाविकांची दर्शनाला गर्दी होत आहे. पालखी रथ परिसरात सोमवारी वरुण राजाचे दमदार हजेरी लावली.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माउली पालखी सोहळ्याचे शनिवारी भक्तिमय वातावरणात आगमन झाले. रविवारच्या मुक्काम केल्यानंतर सोमवारी तरडगावला पालखी रथाचे प्रस्थान झाले. तरडगाव येथे सोमवारी उभे रिंगण झाले. त्यानंतर तेथे मुक्काम केला.

Palkhi Sohala 2024
Palakhi Sohala 2024 : पालखी सोहळ्यात जलसंवर्धन दिंडी

या वेळी या परिसरात दमदार पाऊस झाल्याने वारकरी भिजून चिंब झाले होते. तरडगाव येथून मंगळवारी सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी पालखी रथ सोहळ्याचे प्रस्थान होऊन काळज, सुरवडी येथे थांबे घेऊन दुपारी निंबोरे येथे दुपारचा विसावा घेऊन न्यारी घेण्यात आली. या ठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Palkhi Sohala 2024
Palakhi Sohala 2024 : वारकऱ्यांनी आळंदी गजबजली

त्यानंतर वडजल येथे थांबा घेण्यात आला. सायंकाळी सहाच्या सुमारास फलटण येथील विमानतळावर मुक्कामासाठी आगमन झाले. संवाद वारी उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या अनेक योजनांची माहिती दिली जात आहे.

या माहितीच्या आधारे आम्ही आमच्या गावी गेल्यानंतर या योजनांचा नक्की लाभ घेऊ अशा भावना अनेक वारकऱ्यांनी व्यक्त केल्या. शिस्तप्रिय दिंडीचे सुरू असलेले प्रस्थान लक्षवेधक ठरत आहे. प्रशासनाकडून खबरदारीचे सर्व उपाय घेतले जात आहेत. पालखी सोहळा फलटण येथे मुक्काम करून बुधवारी बरडला प्रस्थान होणार आहे. पालखी सोहळ्याचा मुक्काम गुरुवारपर्यंत असणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com