Animal Market : उन्हाळ्यामुळे बाजारात जनावरांची आवक कमी

गेल्या महिन्यापासून जनावरांची आवक हळूहळू कमी झाली. उन्हाळ्यामुळे ग्राहकांची मागणी कमी असल्याने हा परिणाम झाला.
Animal market
Animal marketAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : गडहिंग्लज बाजार समितीच्या (Gadhinglaj Market Committee) आवारात भरणाऱ्या जनावरांच्या बाजारात आवक घटली आहे. उन्हाळ्यामुळे सरासरी ३० ते ४० टक्के म्हशी आणि बकऱ्यांची आवक कमी आहे.

लिंबूचा दर (Lemon Rate) वधारला आहे. भाजी मंडईत पालेभाज्या, फळभाज्यांचे दर स्थिर आहेत. फळबाजारात द्राक्षांची आवक (Grape Arrival) कायम असून, कोकणातून येणाऱ्या हापूस आंब्यांची आवक वाढली आहे.

गेल्या महिन्यापासून जनावरांची आवक हळूहळू कमी झाली. उन्हाळ्यामुळे ग्राहकांची मागणी कमी असल्याने हा परिणाम झाला. वैरणीची कमतरता हेच मागणी घटनेचे प्रमुख कारण आहे. म्हशींची ६० आवक नोंद झाली.

Animal market
Animal Acidosis : जनावरांना शिळे अन्न खाऊ घातल्याने होऊ शकतो जनावरांचा मृत्यू

दर आठवड्याच्या तुलनेत ती ३० टक्क्यांनी कमी आहे. म्हशींचे २५ ते ८० हजारांपर्यंत दर होते. शेळ्या मेंढ्यांची सत्तर आवक नोंद झाली. पाच ते पंधरा हजारांपर्यंत दर होते.

हिरवा चारा उपलब्ध झाल्यावरच जुलै महिन्यापासून म्हशींची तर मे महिन्यात यात्रा हंगामामुळे बकऱ्यांची आवक वाढण्याची अपेक्षा विक्रेत्यांनी व्यक्त केली.

भाजीमंडईत वांग्याचे दर घसरले आहेत. लावणीतील वांगी विक्रीस येत असल्याने ही आवक अधिक झाली आहे. टोमॅटोच्या दरात किंचित वाढ झाली आहे.

दहा किलोचे दर कोबी १००-१५०, हिरवी मिरची ४००-४५०, ढब्बू ५००, दोडका ३५०, वांगी १५०, टोमॅटो १२०, कारली ३०० रुपये.उन्हाळ्यामुळे मागणी वाढल्याने लिबूं दर वधारले. नगाला २ ते ३ रुपय दर आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com