Agrowon FPO Conference : ‘ॲग्रोवन एफपीओ महापरिषद’ यंदा नाशिकला होणार

Sakal Agrowon Sahyadri Farm : या वर्षीची महापरिषद ‘सकाळ-ॲग्रोवन’ व ‘सह्याद्री फार्म्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली असून, ‘अर्थनियोजन व बाजार व्यवस्थापन’ ही परिषदेची मध्यवर्ती संकल्पना असेल.
Agrowon FPO Mahaparishad
Agrowon FPO MahaparishadAgrowon
Published on
Updated on

Pune News : ‘सकाळ ॲग्रोवन’ची तिसरी राज्यस्तरीय ‘एफपीओ महापरिषद’ यंदा नाशिकच्या सह्याद्री फार्म्स येथे लवकरच होणार आहे. या वर्षीची महापरिषद ‘सकाळ-ॲग्रोवन’ व ‘सह्याद्री फार्म्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली असून, ‘अर्थनियोजन व बाजार व्यवस्थापन’ ही परिषदेची मध्यवर्ती संकल्पना असेल. राज्यातील निवडक २५० शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रत्येकी दोन प्रतिनिधींना महापरिषदेत सहभाग घेता येईल.

शेतीतील विविध समस्यांवर उत्तर एकीतूनच मिळणार हे शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने शेतकरी उत्पादक कंपनी (एफपीओ) ही संकल्पना महाराष्ट्रात वेगाने रूजते आहे. कंपन्यांना भेडसावणाऱ्या अडचणींविषयी चर्चा घडवून दिशा देणारे सशक्त व्यासपीठ ‘सकाळ ॲग्रोवन’ने उपलब्ध करून दिले आहे. त्यातूनच २०२२ मध्ये ‘ॲग्रोवन’तर्फे शेतकरी उत्पादक संस्थांसाठी पहिली राज्यस्तरीय नेतृत्व महापरिषद पुण्यात घेण्यात आली. गेल्या वर्षी पुण्यातच दुसरी ‘एफपीओ महापरिषद’ उत्साहात पार पडली. यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांचा आत्मविश्वास दुणावला.

Agrowon FPO Mahaparishad
Agrowon Dubai Tour : संस्मरणीय, अभ्यासपूर्ण दुबई अभ्यास दौरा

शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून सह्याद्री फार्म्सने देशपातळीवर आपला ठसा उमटविला आहे. राज्यातील काही कंपन्या आता आपण स्वतःदेखील ‘सह्याद्री’सारखे मोठे होऊ, असे स्वप्न बाळगू लागल्या आहेत. त्यामुळेच यंदाची तिसरी महापरिषद सह्याद्री फार्म्सच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली आहे. सह्याद्री फार्म्सचा या क्षेत्रातील अनुभव व ‘ॲग्रोवन’चे व्यासपीठ याचा राज्यातील एफपीओंसाठी उपयोग होणार आहे.

Agrowon FPO Mahaparishad
Agristack Project : जमीन विक्रीच्या व्यवहारांमध्ये अडथळे होणार दूर; राज्यात राबवला जाणार 'अॅग्रिस्टॅक' प्रकल्प

शेतकरी उत्पादक संस्थांसमोरील भांडवल, वित्त व्यवस्थापन व बाजारपेठ ही प्रमुख आव्हाने आहेत. भांडवलाची उभारणी कशी करावी, प्रभावी वित्त व्यवस्थापन कसे करावे व आपल्या भांडवलाला कार्यक्षमपणे कसे वापरावे, खर्च (कॉस्ट) कसा नियंत्रित ठेवावा, अशा अनेक विषयांवर या परिषदेत मंथन होणार आहे. त्याचबरोबर आपल्या उत्पादनासाठी शाश्वत बाजारपेठ निवडणे, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ समजून घेणे, मूल्यवर्धित उत्पादनांसाठी विक्रीचे पर्याय कसे निवडावे अशा व्यावसायिक बाबी तज्ञांकडून समजावून घेण्याची संधी महापरिषदेत मिळणार आहे. यंदाची ‘एफपीओ महापरिषद’ सह्याद्री एफपीसीच्या प्रांगणात भरते आहे. एफपीओ चळवळीला स्वकर्तृत्वातून दिशा देणारे ‘सह्याद्री’चे अध्यक्ष विलास शिंदे यांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन महापरिषदेतील प्रतिनिधींना होईलच; त्याचबरोबर विविध तज्ज्ञांना ऐकण्याची संधीही मिळणार आहे.

QR CODE
QR CODEAgrowon

...अशी करा नोंदणी

महापरिषदेत राज्यातील निवडक २५० शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रत्येकी दोन प्रतिनिधींना सहभागी होता येईल. महापरिषदेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आतापासूनच नोंदणी करावी. नोंदणीची अंतिम मुदत १० सप्टेंबर २०२४ आहे. त्याकरिता https://forms.gle/otZH2NM6GLmguMDd6 या लिंकवर क्लिक करीत नोंदणी करता येईल. तसेच सोबतचा क्यूआर कोड स्कॅन केल्यासही नोंदणी अर्ज भरता येईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com