FPO Conference : ‘अॅग्रोवन’तर्फे ऑक्टोबरमध्ये ‘एफपीओ महापरिषद’

Agrowon FPO Conference : राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना कॉर्पोरेट क्षेत्राशी जोडत व्यवसायात स्पर्धाक्षम होण्याचे उद्दिष्ट ठेवणारी ‘सकाळ अॅग्रोवन’ची दुसरी राज्यस्तरीय ‘एफपीओ महापरिषद’ यंदा ऑक्टोबरमध्ये होत आहे.
FPO
FPOAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना कॉर्पोरेट क्षेत्राशी जोडत व्यवसायात स्पर्धाक्षम होण्याचे उद्दिष्ट ठेवणारी ‘सकाळ अॅग्रोवन’ची दुसरी राज्यस्तरीय ‘एफपीओ महापरिषद’ यंदा ऑक्टोबरमध्ये होत आहे.

समूह शेतीद्वारे उत्पादनापासून विपणनापर्यंत वाटचाल करीत व्यावसायिक जगतात उतरलेल्या शेतकरी उत्पादक संस्थांसाठी ‘सकाळ अॅग्रोवन’कडून जून २०२२ मध्ये पहिली ‘राज्यस्तरीय नेतृत्व महापरिषद’ (एफपीओ लीडरशिप कॉनक्लेव्ह) यशस्वीपणे पार पडली होती.

या संकल्पनेचे समूह शेतीशी संबंधित संस्था व कॉर्पोरेट जगतातून स्वागत केले गेले होते. त्यामुळे यंदा दुसरी महापरिषद आयोजित केली जात आहे. यातील सहभागी एफपीओ, एफपीसींना शाश्‍वत विकासाचा मार्ग दाखविण्यासाठी नामांकित तज्ज्ञ या महापरिषदेला लाभणार आहेत.

राज्यातील २५० निवडक एफपीओंमधील प्रत्येकी दोन प्रतिनिधींचा सहभाग या एकदिवसीय महापरिषदेत असेल. राज्यात हजारोच्या संख्येने एफपीओ स्थापन झालेल्या आहेत.

FPO
FPO Export : शेतकरी उत्पादक कंपनीच शेतीमालाची थेट निर्यात करणार

परंतु उद्दिष्टांप्रमाणे बांधणी आणि कामकाज करीत नावरूपाला येणाऱ्या संस्थांची संख्या तुलनेने अत्यल्प आहे. ‘एफपीओ महापरिषद’ निमित्ताने शेतकरी उत्पादक कंपन्यांना कॉर्पोरेट क्षेत्राच्या अपेक्षा कळतात. तसेच व्यावसायिक अंगाने वाटचाल करण्यासाठी नेमक्या कोणत्या समस्या उद्‍भवतात, त्यावरील उपाय काय आहे याविषयी माहिती मिळते.

येत्या ऑक्टोबरमध्ये होत असलेल्या दुसऱ्या महापरिषदेत एफपीओंना राष्ट्रीय व जागतिक बाजारात स्पर्धाक्षम होण्यासाठी मंथन होईल. त्यातून या कंपन्यांमधील नेतृत्वाला दिशा मिळेल व एफपीओ क्षेत्राच्या बळकटीकरणाला चालना मिळणार आहे.

या महापरिषदेत एफपीओंमधील नेतृत्वाचा विकास, व्यवसाय व बाजारपेठांमधील नव्या संधी आणि आव्हाने, उपलब्ध शासकीय योजना आदी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल. यशस्वी एफपीओंच्या प्रतिनिधींचे अनुभव, राजकीय व प्रशासकीय क्षेत्रातील धोरणकर्त्यांचे मार्गदर्शन यानिमित्ताने होईल.

FPO
Onion Storage By FPO : हमीभावाने कांदा खरेदीपूर्वीच ‘एफपीओं’ कडून कांद्याची साठेबाजी

याशिवाय सहकारातील कुशल नेतृत्वाकडून अनुभवाचे बोल ऐकण्याची संधी या महापरिषदेच्या निमित्ताने मिळणार आहे. कॉर्पोरेट कंपन्या कशा पद्धतीने एफपीओंसोबत वाटचाल करू इच्छितात, भांडवलनिर्मितीसाठी कोणत्या शासकीय योजना उपयुक्त ठरतील तसेच जागतिक बाजारपेठांमधील संधीचा लाभ घेण्यासाठी एफपीओंना नेमके काय करावे लागेल, याचाही धांडोळा ही महापरिषद घेणार आहे.

महापरिषदेत सहभागी होण्यासाठी...

या महापरिषदेत फक्त निवडक एफपीओंचा समावेश केला जाणार आहे. त्यासाठी निकष ठरविण्यात आलेले आहेत. त्यामुळे महापरिषदेत सहभागी इच्छुकांना आतापासूनच नोंदणी करावी लागेल. नोंदणीची अंतिम मुदत ५ ऑक्टोबर २०२३ आहे. त्याकरिता https://forms.gle/MrDXgzc1FMG8PxPV7 ही लिंक क्लिक करून किंवा क्यूआर कोड स्कॅन करून त्यात माहिती भरावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com