Panchaganga River : पंचगंगेत मृत माशांचा खच, प्रदुषण मंडळाचे जाणीपूर्वक दुर्लक्ष

River Pollution Kolhapur : शिरोळ येथील बंधाऱ्याजवळ गेल्या काही दिवसांपासून जलपर्णीचा विळखा पडला होता.
Panchaganga River
Panchaganga Riveragrowon
Published on
Updated on

Panchaganga River Kolhapur : शिरोळ येथील पंचगंगा नदीत प्रदूषित पाणी आल्याने हजारो मासे मृत्युमुखी पडले. यामुळे नदीपात्रात मृत माशांचा खच पडला आहे. मासे मृत्युमुखी पडल्यामुळे या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असून, याकडे प्रदूषण महामंडळाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याने, जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

शिरोळ येथील बंधाऱ्याजवळ गेल्या काही दिवसांपासून जलपर्णीचा विळखा पडला होता. जलपर्णी काढण्याकरिता प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात होती.

हजारो मृत माशांचा पंचगंगेत खच

दरम्यान, सोमवारी (ता. १३) व मंगळवारी (१४) पंचगंगा नदीत दुर्गंधीयुक्त व रसायनयुक्त प्रदूषित पाणी मिसळल्यामुळे, मंगळवारपासून नदीपात्रातील मासे ऑक्सिजनअभावी गुदमरून मरत असल्याचे मच्छीमारांच्या लक्षात आले. यामुळे मच्छीमारांनी विनाजाळी मासे पकडण्यास सुरुवात केली. अनेकजण पोती भरून मासे नेत होते.

शिवाय अनेक मृत मासे जलपर्णीतून प्रवाहाबरोबर बंधाऱ्याजवळ आले. यामुळे बंधारा परिसरात मृत माशांचा खच पडलेला आहे. दूषित काळे पाणी व मृत माशांमुळे या परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे.

Panchaganga River
Panchaganga Pollution : मैला, रक्त, काळे फेसाळलेले थेट पाणी पंचगंगा नदीत, प्रदुषण मंडळाकडून पाण्याची चाचणी

रासायनयुक्त दूषित पाण्याबरोबर अनेक गावांतील सांडपाणी व मैलामिश्रित पाणी नदीपात्रात मिसळत आहे. हे पाणी विषारी बनले असून, पिण्यास अयोग्यच बनले आहे. जलचरांबरोबर मानवी आरोग्यासही ते पाणी अयोग्य बनले असताना, प्रदूषण महामंडळाने याकडे दुर्लक्ष केले आहे.

पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न शासन स्तरावरून निकाली काढण्याकरिता लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत नाहीत, हे उघड आहे. प्रत्येक वर्षी लाखो मासे मृत्युमुखी पडून, तसेच दूषित पाण्यामुळे नागरिकांना साथीच्या रोगांना सामोरे जावे लागत आहे, यामुळे हे पाणी पिऊन माणसे मेल्यानंतरच प्रदूषण महामंडळ कारवाई करणार का?

- रामदास गावडे, शिरोळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com