Alandi News : लोणावळ्याजवळील कुरवंडे येथील उगमापासून आळंदीपर्यंत इंद्रायणी नदीच्या वाढत्या प्रदूषणाचे परिणाम तीव्रपणे जाणवू लागले आहेत. सोळू, मरकळ, गोलेगाव, पिंपळगाव ग्रामपंचायत हद्दीत शेतांमध्ये पाइपलाइनमधून येणारे प्रदूषित पाणी पिकांना नाइलाजाने द्यावे लागत आहे.
शेतामध्येही पाण्यात पांढऱ्या फेसाचे पुंजके तयार होत आहेत. पाटातील पाण्यात पाय ठेवला की पायाला खाज सुटत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्या, शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनलाही काळपट पाणी, तेलकट तवंग आणि फेस येत आहे.
नदीप्रदूषणाविरोधात आवाज उठवून वारकरी, पर्यावरणप्रेमींच्या तोंडाला फेस आला. मात्र शासन आणि प्रशासन नदी प्रदूषण कायम स्वरूपी थांबविण्यासाठी तत्काळ ठोस उपाययोजना राबविण्याची गरज आहे.
इंद्रायणीत शेवाळयुक्त पाणी, पाण्याला काळपट रंग येणे इथपर्यंत प्रदूषणाचा स्तर मर्यादित होता. मात्र गेल्या वर्षभरात तेलकट तवंग, पांढऱ्या रंगाचा फेस नदीत दिसत आहे. मात्र त्याचा काहीही फरक कारखाने, सांडपाणी सोडणाऱ्या यंत्रणांना पडलेला नाही.
थोडक्यात महत्त्वाचे...
नदीत काही ठिकाणी जलपर्णी आणि तेलकट पांढरा तवंग
प्रदूषित पाण्यात काही भाविक स्नान करतात
कपडे, गाड्या धुवायचे काम सुरू
जागोजागी मासे मृत पावत आहेत
गावांच्या नळपाणी योजनेवरही नदीच्या प्रदूषण परिणाम
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.