Premature Fruiting : फळपिकात अकाली फळधारणा नकोच

Dr. Sanjay Patil : कोणत्याही फळपिकाची संपूर्ण शाखीय वाढ झाल्याशिवाय त्यावर अकाली फळधारणा धरू नये, असा सल्ला मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी दिला आहे.
Dr. Sanjay Patil
Dr. Sanjay PatilAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : कोणत्याही फळपिकाची संपूर्ण शाखीय वाढ झाल्याशिवाय त्यावर अकाली फळधारणा धरू नये, असा सल्ला मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी दिला आहे.

‘माझा एक दिवस बळीराजासाठी’ या उपक्रमांतर्गत नुकताच सिल्लोड (जि.छत्रपती संभाजीनगर) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी आंबा बागायतदार आमेर सत्तार, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बरिदे,

Dr. Sanjay Patil
Fruit Processing Industry : शेतकऱ्यांनी फळप्रक्रिया उद्योग सुरू करावेत ः डॉ. गोखले

कृषी अधिकारी प्रदीप दापके, लागवड खर्च योजनेचे कृषी सहायक भगवान सपकाळ, मीनाक्षी ठाकरे, योगेश हराळ, शाकेर मिर्झा आदी उपस्थित होते.

Dr. Sanjay Patil
Citrus fruits : लिंबूवर्गीय फळपिकांसाठीच्या सिट्रस इस्टेटसाठी कोट्यावधींचा निधी

या वेळी डॉ पाटील म्हणाले, ‘‘लहान वयाच्या फळझाडांना मोहर आल्यास तो काढून टाकावा. अन्यथा याचा विपरीत परिणाम झाडाच्या वाढीवर होतो.

यामुळे झाडाची रोग- किडींना प्रतिकार करण्याची क्षमता कमी होऊन मोठे नुकसान संभविते. मोहर काढल्यानंतर ताबडतोब बुरशीनाशकाची फवारणी करावी,’’ असेही डॉ. पाटील म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com