
Cotton Value Chain : कापसापासून कापडापर्यंत आणि कापडापासून फॅशनपर्यंत सगळ्याप्रकारचे इंटीग्रेशन अमरावतीमध्ये होणार आहेत. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना टेक्स्टटाईल पार्कमुळे होणार आहे, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. अमरावती येथील विमानतळाचे उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बुधवारी (ता.१६) बोलत होते.
यावेळी केंद्रीय वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.
फडणवीस पुढे म्हणाले, "मागच्या सरकारच्या काळात टेक्स्टटाईल हब अमरावतीमध्ये सुरू केलं. त्यामुळे आता अमरावतीमधील एमआयडीमधील जवळजवळ सर्व प्लॉट संपले. तिथे औद्योगीकरण वाढलं. पीएम मोदींनी टेक्स्टाईल मित्राचा पार्क अमरावतीमध्ये दिला आहे. २ लाख रोजगार त्यातून उपलब्ध झाला आहे." असंही मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी विदर्भाच्या सिंचन प्रश्न कायमचा संपणार आहे, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला. ते म्हणाले, "वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प हाती घेतला आहे. विशेषत; पश्चिम विदर्भाचे पाच जिल्हे आणि पूर्व विदर्भातील दोन असे एकूण सात जिल्ह्यांचा चेहरामोहरा बदलणार आहे. त्यातून दहा लाख एकर जमीन पाण्याखाली येणार आहे. या प्रकल्पाचं बाबी अंतिम चरणात आहेत. या प्रकल्पा विदर्भ कायमचा दुष्काळमुक्त होणार आहे. तसेच कोरडवाहू क्षेत्र हा विषय विदर्भातील संपेल" असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा विदर्भातील अमरावती विभागात झाल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. यावेळी अमरावतीसोबत अकोला विमानतळ, यवतमाळ विमानतळ विस्तारीकरणावर भाष्य केलं. उद्योजक विमानतळ पाहता आणि मग ज्या ठिकाणी विमानतळ असेल तिथे गुंतवणूक करतात, असंही फडणवीस म्हणाले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विमानतळामुळे विदर्भाच्या ग्रामीण भागाचा विकास होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मित्रा टेक्स्टटाईल पार्क, वस्त्रोउद्योग धोरण तसेच संत्र्यावरील प्रक्रिया उद्योगामुळे विदर्भाचा विकास होईल, असंही अजित पवार म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.